संजय तिवारी, नागपूर: नागपुरात एका नवयुवक मित्राने दुसऱ्या अल्पवयीन मित्राची नियोजनबद्ध रीतीने कोल्ड्रिंक मध्ये विष देऊन निर्घृण हत्या केल्याचे खळबळजनक सत्य समोर आले आहे. अल्पवयीन मित्राची श्रीमंती आपल्याला सहन झाली नाही, म्हणून कोल्ड्रिंगमध्ये विष देऊन त्याला संपवल्याची कबुली आरोपी मुलाने दिली आहे. या भयंकर घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत 19 वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंक मध्ये जहर देऊन हत्या करण्याचा हा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेदांत खंदाडे या 17 वर्षीय नवयुवकाची हत्या करण्यात आली असून मिथिलेश चकोले असे आरोपीच नाव आहे.
आरोपी आपल्या आई वडीलांना एकुलता मुलगा असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. अत्यंत थंड डोक्याने प्लॅनिंग करून आरोपीने हे कृत्य योजनाबद्ध तऱ्हेने पार पाडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.मृतक मित्र वेदांत हा श्रीमंत घरचा असल्याने त्याला सारे काही सहज उपलब्ध होते..तो आपली श्रीमंती दाखवत होता.. याचा हेवा वाटल्याने आणि त्याची श्रीमंती सहन न झाल्याने घनिष्ठ मित्राने ही हत्या केल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे.
महिलेचा 91 वर्षांच्या पतीवर संशय, संतापलेल्या वृद्धाने उचललं धक्कादायक पाऊल; प्रकरण पोहोचलं कोर्टात
वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते. वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती. त्याचे वडील काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकून ते या परिसरात राहायला आले तेव्हा वेदांत आणि मिथिलेशची मैत्री झाली. मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे.दोघेही चांगले मित्र असल्याने 8 तारखेला दोघेही फिरायला गेले. एका पान टपरीवर दोघांनी कोल्ड्रिंक ची एक बॉटल घेतली आणि पिण्यास सुरुवात केली.
मात्र आरोपीने नकळत पणे कोल्ड्रिंकमध्ये जहर टाकलं आणि स्वतः ते न गिळता थुंकू लागला. मात्र, कसलीही शंका आली नसल्याने वेदांतने आपल्या हिस्सातील कोल्ड्रिंक पूर्ण रिचवली.त्यामुळे काही वेळातच त्याची ताब्यात बिघडली, त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पोलीस तक्रार होताच प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता त्याचा मृत्यू जहर पिल्याने झाल्याचं समोर आले.
नक्की वाचा: ...म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केलं मुंडन, असा फेडला नवस; पाहा PHOTO
पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्याच्या मित्राची चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तपासाचा रोख बदलावा या हेतूने खंडणीच्या संदर्भात एक पत्र देखील मिळाल्याचं पुढे येत आहे मात्र, पोलीस त्याचा देखील तपास करत आहे. आरोपी मिथिलेश याने विष दिल्याचे आणि खंडणीचे पत्र पाठविण्याचे कबूल केले असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.