Nagpur News: 11 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, Video ही काढला, 12 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य

आत गेल्यानंतर त्याने त्या तरुणीवर तिथे अत्याचार केला. अत्याचार करत असताना दोन मित्रानी त्याचा व्हिडीओ बनवला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नागपूरमध्ये तीन मित्रांनी ११ वीच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आणि अत्याचाराचा व्हिडीओ काढला
  • आरोपी १२ वीचा विद्यार्थी असून त्याला अटक करण्यात आली असून त्याला परीक्षेचा पेपर देता आला नाही
  • पिडीत तरुणीने काही दिवस शांत बसल्यानंतर कुटुंबीयांना घटना सांगितली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नागपूर:

संजय तिवारी 

12 वीची परिक्षा सुरू झाली आहे. पण परिक्षा देण्याचे सोडून नको तो कांड बारावीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. ही धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. इथं तीन मित्रांनी मिळून 11 वीत शिकणाऱ्या तरूणीवर सामूहिक बलात्कार केला. ऐवढेच नाही तर अत्याचार करण्याचा व्हिडीओ ही काढण्यालाचं समोर येत आहे. तो व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांनी या अल्पवयीन तरुणीचे एकामागू एक तिघांनी शोषण केलं. ही बाब तरुणींना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. यातील मुख्य आरोपी हा 12 वीचा विद्यार्थी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुले तो त्याचा परिक्षेचा पेपर ही देवू शकला नाही. ही माहिती त्याच्या वडीलांना मिळाल्यानंतर त्यांना हार्ड अटॅक आला आहे. 

नागपूरच्या नंदनवन पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पिडीत तरुणी ही 11 वीत आहे. आरोपी हा तिच्या ओळखीचा होता. त्याने या आधी ही या तरुणी सोबत अश्लील वर्तन केले होते. त्यानंतर तो वारंवार तिला मेसेज करत होता. शिवाय भेटण्यासाठी दबाव टाकत होता. त्यातून त्याने तिला घरी येण्यास सांगितले. घरी सर्व जण असतील त्यामुळे ती मुलगी ही त्याला भेटण्यासाठी तयार झाली. त्याच वेळी मुख्य आरोपीने आपल्या दोन मित्रांना तिथे बोलवून घेतले होते. ती घरी आल्यानंतर तिला तो आतल्या खोलीत घेवून गेला. 

नक्की वाचा - Pune News: 'राजकारण खूप खराब!', हात जोडले, डोळे पाणावले, रिलस्टार सरपंचांनी पराभवाचे कारण सांगितले

आत गेल्यानंतर त्याने त्या तरुणीवर तिथे अत्याचार केला. अत्याचार करत असताना दोन मित्रानी त्याचा व्हिडीओ बनवला. तिला व्हिडीओ काढला असल्याचं सांगितलं. शिवाय तो व्हायरल करण्याची धमकी देत, त्या दोघांनी ही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्या वेळचे ही व्हिडीओ बनवले गेल्याची चर्चा आहे. ही घटना घडल्यानंतर ती तरूणी पूर्ण पणे हादरून गेली होती. काही दिवस ती शांत बसली. चार दिवसानंतर तिने सर्व घटना आपल्या कुटुंबीयांनी सांगितली. कुटुंबीयांनी ही तातडीने पोलीस स्टेशन गाठले. झालेली सर्व घटना पोलीसांना सांगितली. त्यानुसार तक्रा दाखल करण्यात आली. शिवाय तातडीने कारवाई ही करण्यात आली. 

नक्की वाचा - Dombivali News: 'धुरंधर'चं शुटींग ज्या पुलावर झालं, तो माणकोली पुल पुन्हा चर्चेत, यावेळी कारण काय?

तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी आरोपी तरुणांना ताब्यात घेतले आहे. यातील दोन तरुण हे अल्पवयीन आहेत. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असल्याने बारावीला असलेल्या विद्यार्थ्याला आपला पेपर देता आला नाही. आपल्या मुलाच्या कृत्याची माहिती त्याच्या वडीलांना मिळताच त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांनाही तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात खरोखर व्हिडीओ बनवला गेला का याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.  
 

Advertisement