संजय तिवारी, नागपूर: एका मुलीने आपल्या वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने त्याला दहा वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुलीची तक्रार खोटी असल्याचा निर्वाळा दिला असून या पित्याची निर्दोष मुक्तता करत तत्काळ कारागृहातून सोडण्यास सांगितले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या मुलीने ती 14 वर्षांची असताना आपल्या वडीलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला होता. जवळच्या नात्यातील एका मुलासोबत मुलीचे शारीरिक संबंध अनेक वेळा स्थापित झाल्याचे दिसत असून त्याच्यासोबत मुलीचा लग्न करण्याचा आग्रह होता.
ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचे आगामी निवडणूकांत स्वबळाचे संकेत पण...
मात्र वडीलांनी यावर आक्षेप घेऊन नकार दिला असल्याने अल्पवयीन मुलीने बलात्काराची खोटी तक्रार केली असण्याची शक्यता आहे असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वडिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुलीचे पालक या नात्याने मुलीसाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी वडील योग्य व्यक्ती आहेत, असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले आहे. मात्र, मुलीला आवडणारा मुलगा तिच्यासाठी योग्य जोडीदार नव्हता हे वडिलांचे मत योग्य होते असे यावेळी खंडपीठाने म्हटले आहे.