Nagpur News: मुलगी झाली म्हणून पत्नी सोबत भयंकर कृत्य, पतीने उचललं असं पाऊल ज्याने एका क्षणात...

तक्रारदार महिलेचा विवाह 2024 मध्ये झाला होता. आरोपी इम्रानचे हे दुसरे लग्न होते. विवाहानंतर काही काळ सुखात गेला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरून पत्नीचा छळ करून तिला बेकायदेशीरपणे 'तिहेरी तलाक' दिल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी पती इम्रान रशीद शेख आणि सासू सईदा बेगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये तिहेरी तलाकविरोधी कायदा संमत केल्यानंतरही अशा घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पण मुलगी झाल्याच्या कारणावरून दिलेल्या या तलाक मुळे एकच खळबळ उडाली आहे. 

छळाची मालिका
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा विवाह 2024 मध्ये इम्रानशी झाला होता. हे महिलेचे पहिले, तर इम्रानचे दुसरे लग्न होते. ऑगस्ट 2025 मध्ये पीडित महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगा हवा असलेल्या सासरच्या मंडळींनी येथूनच तिचा छळ सुरू केला. मुलगी झाल्याच्या कारणावरून पती आणि सासूने तिला टोमणे मारणे आणि शारीरिक-मानसिक त्रास देणे सुरू केले. मुलगी झाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. "तुला मुलगीच कशी झाली?" असे म्हणत तिला वारंवार मारहाण आणि मानसिक त्रास दिला जाऊ लागला. ती हा त्रास सहन करत होती. मात्र पुढे तर हद्दच झाली. पतीने तिला थेट तलाक देवून टाकला. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. 

Advertisement

नक्की वाचा - Liquor Market: दारूच्या बाजारात मोठा 'झोल', फ्रेंच कंपनीची चाल, विकला जाणार फक्त आपलाच माल

कायद्याचे उल्लंघन
हा वाद इतका विकोपाला गेला की, इम्रानने आपल्या पत्नीला थेट 'तिहेरी तलाक' दिला. 2019 च्या कायद्यानुसार, तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेला अशा प्रकारचा एकतर्फी तलाक बेकायदेशीर आणि गुन्हा आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्याची नोंद केली आहे. मुलगी नको होती म्हणून एका नराधम पतीने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


Topics mentioned in this article