जाहिरात

Liquor Market: दारूच्या बाजारात मोठा 'झोल', फ्रेंच कंपनीची चाल, विकला जाणार फक्त आपलाच माल

पर्नोड रिकार्डसह इंडो स्पिरिट्स, पाथवे एचआर सोल्यूशन्स यांसारख्या इतर 7 संस्थांचीही चौकशी केली जाणार आहे.

Liquor Market: दारूच्या बाजारात मोठा 'झोल', फ्रेंच कंपनीची चाल, विकला जाणार फक्त आपलाच माल
  • दिल्लीतील मद्य विक्री बाजारात पर्नोड रिकार्ड कंपनीवर स्पर्धा नियमांचे उल्लंघन करण्याचा गंभीर आरोप आहे
  • कंपनीने रिटेल विक्रेत्यांना बँक कर्जासाठी 200 कोटी रुपयांची गॅरंटी दिली आहे
  • पर्नोड रिकार्डच्या अंतर्गत ईमेलमध्ये धोरणात्मक फायदा मिळवण्यासाठी आर्थिक मदतीची चर्चा आढळली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दिल्लीतील दारू बाजारातील एक मोठी कायदेशीर लढाई आता देशातील सर्वात मोठी व्यापारी नियामक संस्था 'भारतीय स्पर्धा आयोग' (CCI) कडे पोहोचली आहे. जगातील दिग्गज मद्य उत्पादक कंपनी 'पर्नोड रिकार्ड' (Pernod Ricard) वर आपल्या ब्रँड्सची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिल्लीतील रिटेलर्सना हाताशी धरून इतर स्पर्धक कंपन्यांची विक्री रोखण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. केवळ आपलेच ब्रँड्स बाजारात दिसले पाहिजेत, यासाठी कंपनीने रिटेलर्सना 200 कोटींच्या बँक हमीचे आमिष दाखवल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण केवळ व्यावसायिक स्पर्धेपुरते मर्यादित नसून, मुक्त बाजारपेठेच्या तत्त्वांना हरताळ फासणारे आहे. महासंचालकांकडून होणाऱ्या या चौकशीत अनेक बड्या वितरकांचे धाबे दणाणले आहेत.

200 कोटींची 'गॅरंटी' आणि शेल्फवर कब्जा
हा संपूर्ण वाद 2021 च्या दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित आहे. आरोपानुसार, पर्नोड रिकार्डने दिल्लीतील मद्य विक्रेत्यांना बँक कर्ज आणि लायसन्स मिळवून देण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांची (सुमारे 23 दशलक्ष युरो) कॉर्पोरेट गॅरंटी दिली होती. मात्र, ही मदत निस्वार्थ नव्हती. ज्या विक्रेत्यांना ही आर्थिक मदत मिळाली, त्यांनी आपल्या दुकानात केवळ पर्नोड रिकार्डचे ब्रँड्स (उदा. चिवास रीगल, एब्सोल्यूट व्होडका) प्रामुख्याने विकणे आणि इतर कंपन्यांच्या स्टॉकवर मर्यादा आणणे, अशी अट घालण्यात आली होती.

नक्की वाचा - Tamil Nadu CM oath ceremony: तमिळनाडूत 'विजय'राज! थलपतीने घेतली CM पदाची शपथ; आई- वडिलांच्या डोळ्यात अश्रु

अंतर्गत ईमेलमुळे बिंग फुटले
CCI ने आपल्या आदेशात कंपनीच्या काही अंतर्गत ईमेलचा संदर्भ दिला आहे. यामध्ये कंपनीचे अधिकारी लायसन्ससाठी बोली लावणाऱ्या रिटेलर्सना आर्थिक मदत देऊन दिल्लीत 'धोरणात्मक फायदा' मिळवण्याबाबत चर्चा करताना आढळले आहेत. यामुळे ग्राहकांच्या निवडीवर मर्यादा येत असून बाजारपेठेतील निकोप स्पर्धेला बाधा पोहोचत असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.

नक्की वाचा - Pune News : 8 व्या मजल्यावर लटकली, समोर चिमुकली मुलं उभी, पुढं जे घडलं... पुण्यातील काळीज पिळवटणारा VIDEO

90 दिवसांत चौकशीचा अहवाल सादर होणार
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन CCI ने आपल्या महासंचालकांना (DG) सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढील 90 दिवसांत हा तपास अहवाल सादर करायचा आहे. पर्नोड रिकार्डसह इंडो स्पिरिट्स, पाथवे एचआर सोल्यूशन्स यांसारख्या इतर 7 संस्थांचीही चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमुळे दिल्लीच्या मद्य बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com