Nagpur Hit and Run प्रकरणाला नवं वळण, CCTV फुटेजनंतर पोलिसांचे 2 मोठे खुलासे

Nagpur Hit and Run case : नागपूरमधील हिट अँट रन प्रकरणात दोन महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हातील लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

Nagpur Hit and Run case : नागपूरमधील हिट अँट रन प्रकरणात दोन महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हातील लागलं आहे. त्यामध्ये संकेच बावनकुळे कार चालवत नव्हता या त्यांच्या दाव्याला पृष्टी मिळाली आहे. त्याचबरोबर आरोपींनी खरंच बीफ खाल्लं होतं का? ही माहिती देखील उघड झाली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ज्या ऑडी कारनं ही धडक दिली त्या कारचा चालक मद्याच्या अंमलाखाली नव्हता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मद्यप्राशन करणे आणि मद्याच्या अंमलाखाली असणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत, असं पोलिसांनी NDTV मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीमध्ये स्पष्ट केलंय. अपघातातील ‘ऑडी कार' भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावार आहे. हा अपघात झाला त्यावेळी संकेतही कारमध्ये असल्याची माहिती पुढं आलीय. त्यामुळे या प्रकरणावर राजकारण चांगलंच तापलं आहे. 

संकेत बावनकुळे यांनी मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास का दिली? या प्रश्नावर आरोपी वाहन चालक अर्जुन हावरेनं मद्यप्राशन केले असले तरी तो मद्याच्या प्रभावाखाली नव्हता.  त्याच्या डोळ्यांची बुबुळे, श्र्वासाची गती, हृदय गती तपासणी केली. त्यानंतर तो मद्याच्या प्रभावात नव्हता हे तपासणी अहवालात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. 

( नक्की वाचा : अपघात बावनकुळेंच्या कारचा, जुंपली मात्र मविआच्या नेत्यांची )
 

फॉरेन्सिक लॅबमध्ये ही सँपल अधिक तपासाणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्या अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतर आणखी बाबी स्पष्ट होतील, असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

बीफ खाण्याचा आरोप आधारहीन

ऑडी कारमघ्ये असलेल्या तिघांनी वैद्यकीय तपासणीमध्ये बीफ खाल्ल्याचे उघड झाले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. नागपूर पोलिसांनी हा आरोप फेटाळलाय. जिवंत माणसाची वैद्यकीय तपासणी होती कोणत्याही मृताचे पोस्ट मॉर्टम नव्हते. वैद्यकीय तपासणीमध्ये हा निष्कर्ष  काढता येणे शक्य नाही, असं पोलिसांच्या सुत्रांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : IAF अधिकाऱ्याची वरिष्ठांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार, ओरल....साठी बळजबरी केल्याचा आरोप )
 

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या सीताबर्डी भागात रविवारी मध्यरात्री 'हिट अँड रनची' घटना घडली. एका भरधाव ऑडी कारने काही वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळाजवळ असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाडी चालवत असलेल्या मुलांना गाडी बाहेर काढले आणि चोप दिला. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनी या प्रकरणात संकेत बावनकुळेंना पोलीस वाचवत असल्याचा आरोप केला आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article