भारतीय वायू सेनेला हादरवून टाकणारं धक्कादायक प्रकरण श्रीनगरमध्ये उघड झालं आहे. वायू सेनेतील महिला अधिकाऱ्यानं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. जम्मू काश्मीरमधी बडगाम पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी श्रीनगरमध्ये कामावर आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही या प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत, अशी माहिती भारतीय वायूसेनेनं NDTV ला दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आपण लैंगिक शोषण, छळवणूक आणि मानसिक त्रास सहन केला आहे, अशी तक्रार या महिला अधिकाऱ्यानं केली आहे.
काय आहे प्रकरण?
महिला अधिकाऱ्यानं केलेल्या तक्रारीनुसार, '31 डिसेंबर 2023 रोजी मेसमध्ये झालेल्या न्यू इयर पार्टीमध्ये मला वरिष्ठ अधिकाऱ्यानं गिफ्ट मिळालं का? हे विचारलं. मी ते मिळालं नाही असं सांगताच त्यांनी मला त्यांच्या रुममध्ये बोलावलं. मी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली त्यावर त्यांनी ते दुसरिकडं असल्याचं सांगितलं.
वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपल्याला ओरल @#$%@ साठी बळजबरी केली आणि विनयभंग केला. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना ढकललं आणि तिथून पळाले. त्यानंतर शुक्रवारी माझे घरचे जातील तेंव्हा आपण पुन्हा भेटू असं त्यांनी मला सांगितलं.'
( नक्की वाचा : गृहमंत्री म्हणून काश्मीरला जाताना माझी @#$%@ होती, सुशीलकुमार शिंदेंची धक्कादायक कबुली )
तक्रार करण्यास उशीर का?
महिला अधिकाऱ्यानं ही तक्रार करण्यास उशीर का झाला याचं कारण सांगितलं आहे. 'मी घाबरले होते. तसंच या प्रकराच्या घटना घडल्या तर काय करावं याबाबत माहिती नव्हती. मला याबाबत तक्रार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावाही पीडितेनं केलाय. घटनेनंतर त्या अधिकाऱ्यानं माझं पोस्टिंग होतं तिथं भेट दिली. त्यावेळी काही घडलंच नाही, असा त्यांचा आविर्भाव होता. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाची कोणतीही भावना नव्हती, असंही पीडित महिला अधिकाऱ्यानं सांगितलं.
( नक्की वाचा : Puja Khedkar : पूजा खेडकरचा खेळ खल्लास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय )
मी या प्रकरणाबाबत दोन महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी मला तक्रार कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. मी या काळात सहन केलेल्या मानसिक वेदनेचं वर्णन करु शकत नाही. सैन्यात सहभागी झालेल्या एका अविवाहित महिलेला या प्रकरणाची घृणास्पद वागणूक मिळाली आहे, असा खेद त्यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world