Nalasopara News : पहाटेची वेळ...अजितने कोयता घेतला अन् बहिणीचं मुंडकच छाटलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

ज्या पद्धतीने आरोपी तरुणाने स्वत:च्या बहिणीनी हत्या केली ते पाहून कुणाच्याही पायाखालची जमिन सरकेल.   

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा येथील सर्वोदय वसाहतीत एका भावाने बहिणीची कोयत्याने हत्या केली. ज्या पद्धतीने आरोपी तरुणाने स्वत:च्या बहिणीनी हत्या केली ते पाहून कुणाच्याही पायाखालची जमिन सरकेल.   

७ कोटींच्या संपत्तीतून बहिणीची शिरच्छेद...

सुप्रिया कानडे (३५) आणि भाऊ अजित मालुष्टे (४०) यांच्यात संपत्तीच्या कारणातून वाद झाला होता. पहाटेच्यादरम्यान भाऊ-बहि‍णींमध्ये वाद झाला होता. त्यावेळी रागाच्या भरात आरोपी अजितने बहिणीवर कोयत्याने वार केले. यानंतर त्याने तिचा शिरच्छेद केला. दुसरीकडे आई सुप्रियाला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र आरोपीने आईवरही हल्ला केला. आरोपीची आईदेखील यात जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातील मानसिक रुग्ण असल्याचा बनाव केला होता.  मात्र तो मनोरुग्ण नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मनोरुग्ण हा नोकरी करीत नव्हता. तर बहीण सुप्रिया नोकरी करीत होती आणि घर चालवित होती. सात कोटींच्या जागेच्या वादातून भाऊ-बहि‍णींमध्ये वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात आरोपी भावाने बहिणीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली.

नक्की वाचा - 'रामलीले'त रावण व्हायचा, क्राइम थ्रिलर वेब सीरिजचंही वेड; वडिलांचे तुकडे करणाऱ्या अक्षयचा भयाण भूतकाळ

वसई-विरारमध्ये वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याशिवाय सुरक्षिततेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वसईत एका अल्पवयीन मुलाने आपल्या आत्याची हत्या केल्याचंही समोर आलं होतं.


 

Topics mentioned in this article