
मनोज सातवी
अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने सावत्र वडिलांवरच चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून या तरुणीने या सावत्र पित्याच्या गुप्तांगावरच वार केला. त्यानंतर त्याच्या गळ्यावर ही वार केले. हल्ला झाल्यानंतर तो रस्त्यावर पळाला. त्याच्या मागे चाकू घेवून ही तरुणी ही पळाली. त्यावेळी रस्त्यावर एकच गर्दी झाली. सावत्र बाप रक्त्याच्या थारोळ्यात पडला होता. त्याच वेळी उपस्थितांनी त्या तरुणीची समजूत काढली. पोलिस तुला न्याय देतील असं तिला सांगितलं. त्यानंतर तिने आपल्या हातातला चाकू फेकून दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसर आहे. या ठिकाणी सावत्र वडिलांकडून एक तरुणीवर सतत अत्याचार केले जात होते. जवळपास दोन वर्षापासून हे अत्याचार सुरू होते. या लैंगिक अत्याचाराला कंटाळून त्या तरुणीने नराधम वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्याच मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं सर्वच जण हादरले आहेत. शिवाय घटनेनं ही अत्याचाराची घटना ही समोर आली आहे.
मुलीच्या आईने दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर सावत्र मुलीवर बापाचं वाईट लक्ष्य होतं. त्यातून तो तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. सतत दोन वर्ष हे होत होतं. सोमवारी देखील त्यांने तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी जबरदस्ती केली. त्यावेळी तरुणीने त्याच्या डोळ्यावर कपडा बांधला. त्यानंतर तिने त्याच्या गुप्तांगावर वार केला. शिवाय त्याच्या गळ्यावरही वार केले. त्याच अवस्थेत तो रस्त्यावर पळाला.
ती चाकू घेवून त्याच्या मागे पळाली. रस्त्यावरही तिने नराधम बापावर वार केले. तिथे उपस्थित असलेले लोक हे सर्व पाहात होते. याने माझ्यावर अत्याचार केले आहेत. याला मी सोडणार नाही असं ती सांगत होती. त्यावेळी उपस्थितांनी दिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तू चाकू फेकून दे. पोलिस तुला नक्की न्याय देतील. तु पोलिसात जा असंही तिला सांगितलं. शेवटी त्याचं ऐकत तिने चाकू फेकून दिला. त्यानंतर तिच्या नराधम बापाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तरूणीने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ उपस्थित लोकांनी काढला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती तरूणी चाकू दाखवताना दिसत आहे. तर लोक तिला समजवताना दिसत आहेत. सध्या तुळींज पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. शिवाय पुढील तपास सुरू आहे. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world