मनोज सातवी, वसई:
Ilegal Abortion Centre News: बंदी असतानाही अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्भपात तसेच गर्भनिदान केले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. नालासोपाऱ्यात अशाच बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर पालिकेने धाड टाकल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर वसईतील ईश्वर्या हेल्थकेअर प्रा. लि. या सोनोग्राफी केंद्रावरही कारवाई करण्यात आली असून डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नालासोपाऱ्यात बेकायदेशीरपणे गर्भपाताचे औषधोपचार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा पूर्व धानीव बाग येथील शाहीन क्लिनिक येथे डॉ. जबीउल्ला खान (BAMS) बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती.
त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली डमी रुग्ण पाठवण्यात आला. तपासादरम्यान डॉ. खान हा स्त्रीरोगतज्ञ नसतानाही फक्त 1500 रुपयात गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचे समोर आले. यावेळी त्या ठिकाणी बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्यांचा साठाही आढळून आला. त्यानंतर पेल्हार पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरला बेड्या
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318, तसेच MTP Act कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती CMO डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली. त्यांचसोबत वसईतील ईश्वर्या हेल्थकेअर प्रा. लि. या सोनोग्राफी केंद्रावरही कारवाई करण्यात आली आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईश्वर्या हेल्थकेअरवर धाड सोनोग्राफी मशीन केले सील केली आहे.
( नक्की वाचा : Nagpur News : नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पुण्यातील गंभीर प्रकरणात महिलेचा टोकाचा प्रयत्न,प्रकरण काय? )