जाहिरात

Nagpur News : नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पुण्यातील गंभीर प्रकरणात महिलेचा टोकाचा प्रयत्न,प्रकरण काय?

Nagpur Winter Session: नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (9 डिसेंबर) मोठा गोंधळ झाला.

Nagpur News : नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पुण्यातील गंभीर प्रकरणात महिलेचा टोकाचा प्रयत्न,प्रकरण काय?
Nagpur Winter Session:  या प्रकरणामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
नागपूर:

Nagpur Winter Session:  नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (9 डिसेंबर) मोठा गोंधळ झाला. पुण्यातील एका गंभीर वादाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सीताबाई धांडे नावाच्या महिलेने यशवंत स्टेडियमजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

काय आहे प्रकरण?

सीताबाई धांडे यांचे हे आंदोलन पुणे जिल्ह्यातील खराडी परिसरातील चंदन नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी (SRA) संबंधित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे विकास काम बोगस संमती पत्रांच्या आधारे मिळवण्यात आले आहे. त्यामुळे जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे.


( नक्की वाचा : Pune News : बस स्टॉपवर केली मैत्री आणि शाळेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर... संतापजनक घटनेनं पुणे हादरलं! )

या विकासकामाच्या वादातूनच 23 एप्रिल 2025 रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या वसाहतीमध्ये लावलेल्या आगीत तब्बल 100 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता. इतकी मोठी घटना घडूनही, आग लावणाऱ्या संबंधित बिल्डरवर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असा आंदोलकांचा दावा आहे. 

पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे या बिल्डरला अटक केली जात नाही, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे हतबल झालेल्या आंदोलकांनी आपले गाऱ्हाणे थेट सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बाहेर आंदोलन पुकारले होते.

( नक्की वाचा : Shocking News : प्रेम, फसवणूक आणि सत्ता: महिला DSPने जाळ्यात ओढून व्यावसायिकाकडून कोट्यावधी हडपले! )
 

दरम्यान, आंदोलनादरम्यान सीताबाई धांडे यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला आणि अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार अचानक घडल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेत महिलेला वेळीच रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, आत्मदहनाचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com