नालासोपाराच्या (Nalasopara News) प्रगती नगरात दोन वाहतूक पोलिसांना बाप-लेक आणि त्यांच्या साथीदाराने जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल (Traffic Policeman Beaten Video) झाला आहे. भर रस्त्यात ट्राफिक पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी वडील मंगेश नारकर, मुलगा पार्थ नारकर आणि त्याचा साथीदार आकाश पांचाळ यांना तुळींज पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुलगा पार्थ नारकर हा लायसन्सशिवाय गाडी चालवित होता. यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवले. यानंतर मुलाने त्याचे वडील मंगेश नारकर, आणि त्याचा साथीदार आकाश पांचाळ यांना बोलावूव घेतले. यानंतर वडील मंगेश नारकर आणि वाहतूक पोलिसामध्ये बाचाबाची झाली. त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. (Traffic Policeman Beaten)
नक्की वाचा - Porsche Car Accident: 'ते श्रीमंत लोक', आरोपीला 'अल्पवयीन' ठरवल्याबद्दल पीडितांच्या वडिलांचा संताप
त्यावेळी या तिघांनी मिळून दोन्ही वाहतूक पोलिसांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.