जाहिरात

Porsche Car Accident: 'ते श्रीमंत लोक', आरोपीला 'अल्पवयीन' ठरवल्याबद्दल पीडितांच्या वडिलांचा संताप

Pune Porsche Car Accident Updates:  पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळानं (Juvenile Justice Board) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Porsche Car Accident: 'ते श्रीमंत लोक', आरोपीला 'अल्पवयीन' ठरवल्याबद्दल पीडितांच्या वडिलांचा संताप
Porsche Car Accident: पीडित मुलाच्या पालकांनी NDTV शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई:

Pune Porsche Car Accident Updates:  पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळानं (Juvenile Justice Board) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या मंडळानं  मुख्य आरोपीवर प्रौढ म्हणून नव्हे, तर अल्पवयीन म्हणून खटला चालवण्याचा आदेश दिलाय. या निर्णयावर अपघातामध्ये जीव गमावलेल्या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणांच्या वडिलांनी निराशा व्यक्त केली आहे.

काय म्हणाले पीडित मुलांचे वडील?

एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, अश्विनी कोस्टा यांचे वडील सुरेश कोस्टा म्हणाले, "एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी सरकारने बडतर्फ केलेल्या मंडळाच्या सदस्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. मग एका महिन्यातच लोकांची नियुक्ती कशी झाली आणि निर्णय कसे घेतले गेले... त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील."

ते पुढे म्हणाले, "सुरुवातीलाच, संपूर्ण देशाने बाल न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीकडं बोट दाखवलं होतं. दारू पिऊन कार चालवणाऱ्या व्यक्तीला अल्पवयीन कसे काय मानले जाऊ शकते... मला वाटते त्याला प्रौढ म्हणूनच वागवण्यात यावे याबद्दल कोणताही प्रश्न नसावा."
 

(नक्की वाचा : Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण! पुणे पोलिसांना सर्वात मोठा धक्का; बिल्डरच्या अल्पवयीन लेकाला दिलासा )
 

अनीश अवधिया यांचे वडील ओम प्रकाश अवधिया म्हणाले की, "आम्हाला काय मिळेल हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते."

ते पुढे म्हणाले, "सरकारने अशी घटना घडू नये याची खात्री करायला हवी होती. आता हे घडले आहे, तर आपण काय म्हणू शकतो?"

पैशाची ताकद आणि प्रभावाचा हा खेळ आहे का, असे विचारले असता, ते म्हणाले की त्यांच्यासमोर हे घडले नसले तरी, असे काहीतरी नक्कीच घडत आहे हे स्पष्ट आहे. "हे श्रीमंत लोक आहेत."

ते पुढे म्हणाले, "ते आपल्या मुलांना 3 कोटी रुपयांची गाडी देतात... माध्यमांनी असे वृत्त दिले होते की ते रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न करत होते, पण डॉक्टरांमुळे ते करू शकले नाहीत."

( नक्की वाचा : Sahyadri Hospital Pune: महापालिकेने भाड्याने दिलेली जागा सह्याद्री हॉस्पीटलने विकली? )
 

कसा घडला होता अपघात?

19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्श कारने दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना धडक दिली. दोन्ही अभियंते (अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया) जागीच मृत्युमुखी पडले. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा व्यक्ती फक्त 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.

बाल न्याय मंडळाच्या आजच्या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी मंडळाने त्याला जामीन मंजूर करताना लावलेल्या अटींमुळे लोकांमध्ये तीव्र संताप उसळला होता, ज्यात रस्ते सुरक्षेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची अट होती. त्यानंतर त्याला पुणे शहरातील निरीक्षण गृहात पाठवण्यात आले होते.

पीटीआयशी बोलताना, बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील यांनी काही खटल्यांचा हवाला देत, अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याच्या अभियोजन पक्षाच्या मागणीला विरोध केला असल्याचे सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com