योगेश लाटकर
राज्यात अनेक ठिकाणी स्पा सेंटर सुरू आहेत. या ठिकाणी मसाज केली जाते असं सांगितलं जातं. पण या स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते धंडे सर्रास पणे सुरू असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. असं असलं तरी अशा स्पा सेंटरवर कुणाचे ही नियंत्रण नसते. त्यामुळे हे स्पा सेंटर सुरू असल्याची दिसून येतात. शिवाय त्याला राजकीय संरक्षण ही असते की काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. विशेष म्हणजे हे स्पा सेंटर एका राजकीय पक्षाच्या नेत्याचेच आहे.
ही धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. नांदेडमधील कॅनल रोडवर रेड ओक स्पा टू सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये नको ते धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तिथे कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू होते. याची शहानिशा करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यामुळे पोलिसच बनावट ग्राहक बनून या स्पा सेंटरमध्ये गेले होते.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
त्यानंतर इथं छापा टाकण्यात आला. या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या स्पा सेंटरमधून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे. यातील एक मुलगी ही आसामची होती तर तीन मुली या नागपुरच्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याकारवाई नंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरामध्येच असे धंदे सुरू होते यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
नक्की वाचा - Mumbai News: श्रीमंत महापालिकेची शाळा 1 महिन्यापासून बंद, 2 हजार विद्यार्थी वाऱ्यावर
भाग्यनगर पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना अटक केली आहे. स्पा सेंटरचा चालक अमोदसिंग साबळे आणि मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत. स्पा सेंटर चालक आमोदसिंग साबळे हा युवा सेनेचा दक्षिणचा जिल्हाध्यक्ष आहे. तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. स्पा सेंटर चालक राजकीय पक्षाचाच पदाधिकारी निघाल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.