Nandurbar News: बाहेर कॅफेचा बोर्ड, आतमध्ये छोट्या खोल्या अन् नको ते चाळे.. पोलिसांची मोठी कारवाई

Nandurbar News: महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: कॅफे, कॉपी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण- तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मोठी महाविद्यालये असलेल्या परिसरात अशी दुकाने थाटुन हे धंदे सुरु असल्याचे प्रकार अनेक शहरांमध्ये घडत आहेत. अशा कॅफेंविरोधात नंदुरबारमधील शहादा शहरामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण 50 टक्के भरले, पाणीटंचाईची चिंता मिटली!

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  शहादा शहरात अवैधपणे सुरू असलेल्या कॅफे सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना सुरू असलेल्या या कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून शहादा शहरात अवैध कॅफे सेंटरचा सुळसुळाट वाढला होता. विशेषत महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी या ठिकाणी एकत्र येऊन आक्षेपार्ह वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. या तक्रारींची दखल घेत शहादा पोलिसांनी काही कॅफे सेंटरवर छापेमारी करत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, यामुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Satara News: अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा कामगार कसा बनला करोडपती?

शहादा शहरातील अहिंसा चौक परिसरातील एका कॅफे शॉपमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रायव्हेट खोल्या आढळल्या आहेत. तर दोंडाईचा रोडवरील नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या वरती सुरू असलेल्या एका कॅफे सेंटरमध्ये पार्टिशन असलेले रूम आणि सोफ्यावर वापरलेले निरोध आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Topics mentioned in this article