Kalyan News : '15 लाख दे, नाहीतर खल्लास करेन!' गँगस्टरच्या पुतण्याकडून कल्याणच्या व्यावसायिकाला धमकी

Kalyan News : "एकतर मला काम दे, नाहीतर 15 लाख रुपये दे. अन्यथा तुला खल्लास करून टाकेन," अशी धमकी त्याने दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण:

Kalyan News : कुख्यात गँगस्टर नन्नू शहा याचा पुतण्या सूरज शहा याला एका व्यावसायिकाकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याला कल्याण न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांनी कल्याण पश्चिमेकडील जिजाऊ सहकारी सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम घेतले आहे. याच इमारतीच्या जुन्या बांधकामाचे डिमॉलिशन आणि मटेरियल पुरवण्याचे काम मिळवण्यासाठी सूरज शहा याने त्यांना धमकावले. 3 सप्टेंबर रोजी सूरजने निचळ यांना फोन करून "मी नन्नू शहाचा पुतण्या बोलतोय" असे सांगितले.

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी; मराठी तरुणीने चपलेने बदडले, पाहा Video )
 

पहिल्या फोनमध्ये सूरजने निचळ यांना साइटवरील डिमॉलिशन आणि मटेरियल सप्लायचे काम त्यालाच देण्यास सांगितले. निचळ यांनी यावर प्रतिसाद न दिल्याने 5 मिनिटांतच त्याने पुन्हा फोन केला आणि थेट 15 लाख रुपयांची मागणी केली. "एकतर मला काम दे, नाहीतर 15 लाख रुपये दे. अन्यथा तुला खल्लास करून टाकेन," अशी धमकी त्याने दिली.

या धमक्यांमुळे घाबरलेल्या किरण निचळ यांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आणि सूरज शहा याला अटक केली. आता पोलीस सूरजने आणखी किती लोकांना अशा प्रकारे धमकावून पैसे उकळले आहेत, याचा तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article