Shocking news: तो तिचा गळा कापत होता, ती तडफडत होती, लोक VIDEO बनवत होते

या हत्येचा जो व्हिडिओमध्ये समोर आला आहे, त्यात काळ्या शर्टमधील आरोपी अभिषेक कोष्टी दिसत आहे. तो आधी संध्याला कानाखाली मारतो. नंतर तिला जमिनीवर पाडतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात एक तरुण उघडपणे नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गळा चिरत होता. त्यावेळी विद्यार्थिनी तडफडत होती. पण तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. या भयानक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये एक तरुण नर्सिंग विद्यार्थिनीचा गळा चिरताना दिसत आहे. मुलगी जमिनीवर तडफडत आहे. तिच्या आजूबाजूला रक्त वाहत आहे. मुलीचे शरीर रक्ताने माखले आहे. आरोपी तरुण उघडपणे मुलीचा गळा चिरत आहे, पण तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ही घटना 27 जूनची आहे. नरसिंगपूरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयात 19 वर्षीय संध्या चौधरीची दिवसाढवळ्या क्रूरपणे हत्या करण्यात आली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही संपूर्ण घटना लोकांसमोर घडली. पण त्यावेळी कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Assembly News: 'अधिकाऱ्यांना बांधून आणा', मुनगंटीवार भडकले, खोतकर मदतीला धावले, विधानसभेत काय घडलं?

या हत्येचा जो व्हिडिओमध्ये समोर आला आहे, त्यात काळ्या शर्टमधील आरोपी अभिषेक कोष्टी दिसत आहे. तो आधी संध्याला कानाखाली मारतो. नंतर तिला जमिनीवर पाडतो. तिच्या छातीवर बसून तो चाकूने तिचा गळा चिरतो. हे सर्व रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दिवसाढवळ्या घडले. धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टर आणि सुरक्षा रक्षक जवळच उपस्थित होते. पण कोणीही पुढे आले नाही. काही लोक तर घटनेदरम्यान शांतपणे तेथून जात होते. जसे काही घडलंच नाही असा त्यांचा तोरा होता. संध्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती. पण तिला  कुणीही मदत केली नाही.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित

आरोपी सुमारे 10 मिनिटे संध्याचा गळा चिरत राहिला. हल्ल्यानंतर अभिषेकने स्वतःचाही गळा कापण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर तो रुग्णालयातून पळून गेला. रुग्णालया बाहेर असलेल्या बाईक वरून तो पसार झाला. गळा चिरलेला आणि जमिनीवर पडलेला मृतदेह पाहून रुग्ण हादरले होते. जमिनीवर रक्त वाहत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मृणाली डेका यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुणाला पोलिसांनी त्याच दिवशी पकडले. विशेष म्हणजे, हे रुग्णालय जिल्हा मुख्यालय आणि पोलीस नियंत्रण कक्षाच्या अगदी जवळ आहे.

Advertisement