Shocking! पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत; खाली पत्नी पुजा-अर्चा करण्यात लीन

पतीच्या लटकलेल्या मृतदेहाकडे पत्नीनं पाहिलं आणि पुन्हा ती पूजा-अर्चा करण्यात मग्न झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नाशिक:

कौटुंबिक जाचातून एका तरुणाने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं नाशिक हादरलं (Nashik Shocking News) आहे. पतीने आत्महत्या केली त्यावेळी पत्नी खाली बसून पुजेचं मग्न होती. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोड येथे हा प्रकार घडला. येथे कौटुंबिक वादातून नवनाथ घायवट या तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. भीषण म्हणजे नवनाथ यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असताना खाली पत्नी डोक्यावर पदर घेऊन पुजा-अर्चा करण्यात मग्न होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाहिलेलं दृश्य पाहून पोलिसही हादरले. 

नक्की वाचा - ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ

ज्या दिवशी नवनाथ यांनी आत्महत्या केली त्यादिवशी त्यांच्या घरात दुर्गाष्टमीची पुजा होती. या दिवशी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून घायवट यांनी स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती गळफास घेत असताना पत्नी त्याच्या मृतदेहासमोर पूजा मांडून बसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. प्राथमिक तपासात अंधश्रद्धा आणि जादूटोण्यातून ही आत्महत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पोलीस तपासानुसार नवनाथ यांची पत्नी मनोरुग्ण असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.