अलीकडच्या काळात काही धक्कादायक घटना राज्यात घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं ही दिसत आहेत. त्यातून टोकाची पाऊल उचलल्याची प्रकरणही समोर आली होती. कुठे कौटुंबिक वादातून हत्या होत आहे. तर कुठे हुंड्यासाठी छळ केला जात आहे. लैंगिक अत्याचाराच्याही घटना वाढताना दिसत आहेत. त्यात एक धक्कादायक घटना नाशिकच्या मालेगावमध्ये घडली आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.
हर्षाली राहुल अहिरे ही महिला मालेगावच्या सौंदाणे गावात राहात होती. ती 28 वर्षांची होती. तिचे गावातील राहुल अहिरे यांच्या बरोबर लग्न झाले होते. तिला दोन मुले होती. एक मुलगा होता. त्याचं नाव संकेत अहिरे तो 5 वर्षाचा होता. तर आरोही ही ही सात वर्षाची मुलगी होती. सासरच्या लोकांकडून तिचा वारंवार छळ होत होता असं तिच्या कुटुंबियांनी वारंवार आरोप केला आहे. या छळाला कंटाळून हर्षालीने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेताल.
त्यातूनच तिने आपलं जिवन संपवण्याचा निर्णय घेताल. पण हा निर्णय घेत असताना तिने आपल्या दोन चिमुकल्या लेकरांनाही बरोबर घेतलं. त्यांचा त्यात काय दोष. पण त्याचा विचार तिने केला नाही. शेवटी तिने नको तेच केले. घरा शेजारी असलेल्या शेतात ती गेली. शेतातील विहिरीत उडी तिने दोन्ही लेकरांसह उडी घेत आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप हर्षालीच्या नातेवाइकांनी केला आहे.
या आत्महत्येप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात हर्षालीच्या पतीसह सासू, सासरे आणि नणंद या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयत विवाहितेचा पती आणि सासऱ्याला ताब्यात घेतले आहे. शिवाय पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. याघटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय या सगळ्या प्रकणात त्या दोन चिमुल्यांचा काय दोष होता अशी चर्चाही गावात होत आहे.