जाहिरात

Anti pregnancy pills: पुरुषांसाठी आता गर्भनिरोधक गोळी, यशस्वी चाचणीत 'या' गोष्टी आल्या समोर

मानवावरील चाचणीपूर्वी, या औषधाची चाचणी उंदीर आणि इतर प्राण्यांवरही करण्यात आली होती.

Anti pregnancy pills: पुरुषांसाठी आता गर्भनिरोधक गोळी, यशस्वी चाचणीत 'या' गोष्टी आल्या समोर

गर्भनिरोधासाठी महिलांकडे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, पुरुषांसाठी सध्या कंडोम आणि नसबंदी असे मर्यादित पर्याय आहेत. परंतु, लवकरच या पर्यायांमध्ये आणखी एकाची भर पडण्याची शक्यता आहे. पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या (Birth Control Pills For Males) विकसित केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या मानवी सुरक्षितता चाचणीत या गोळ्या यशस्वी ठरल्याची माहिती समोर आली आहे. 

लाईव्ह सायन्सच्या अहवालानुसार, या गोळीचे नाव YCT-529 असे आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि YourChoice Therapeutics नावाच्या कंपनीने ही औषधी एकत्र विकसित केली आहेत. कंपनीने 16 लोकांवर या औषधाची चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान, औषध शरीरात योग्य प्रमाणात पोहोचत आहे की नाही, हे तपासले गेले. तसेच, औषध घेणाऱ्यांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, हार्मोनल बदल, सूज किंवा लैंगिक क्षमतेत बदल यांसारखी गंभीर लक्षणे दिसतात का, हे देखील पाहिले गेले आहे.

नक्की वाचा - Food News: केळी खाणे कोणी टाळावे? 'या' लोकांसाठी केळी आहेत विषसमान, डॉक्टरांनी काय सांगितलं?

या चाचणीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला औषधाचा डोस देण्यात आला. चाचणीनंतर, कोणत्याही व्यक्तीमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे किंवा नकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत हे महत्वाचे मानले जाते. परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, कमी लोकांवर केलेल्या या चाचणीत औषध यशस्वी ठरले आहे. आता हे औषध मोठ्या प्रमाणात लोकांवर चाचणीसाठी पूर्णपणे तयार आहे असं ही सांगितलं जात आहे. मोठ्या चाचणीदरम्यान औषधाची सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोन्हीवर लक्ष दिले जाईल. दरम्यान या चाचणीचे निकाल 22 जुलै रोजी कम्युनिकेशन्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

नक्की वाचा - Deep Freezer: फ्रीजमध्ये बर्फाचे थर साचला आहे? चिंता नको! 'या' आहेत बर्फ काढण्याचा 8 सोप्या पद्धती

सध्या, पुरुषांच्या स्तरावर गर्भनिरोधासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. फक्त कंडोम आणि नसबंदीचाच पर्याय होता. परंतु, भविष्यात जर या औषधाला मंजुरी मिळाली, तर या श्रेणीतील हे पहिलेच औषध ठरणार आहे. मिनेसोटा युनिव्हर्सिटीच्या फार्मसी कॉलेजच्या प्रोफेसर गूंडा जॉर्ज यांच्या मते, हे औषध पुरुषांसाठी एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकते. यामुळे जोडप्यांना गर्भनिरोधाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील असंही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केलं आहे. 

नक्की वाचा - Skin Care: पावसाळ्यात त्वचा होत असेल चिकचिक, तर सकाळी उठल्यावर करा 'हे' 7 उपाय

मानवावरील चाचणीपूर्वी, या औषधाची चाचणी उंदीर आणि इतर प्राण्यांवरही करण्यात आली होती. उंदरांवर हे औषध खूप प्रभावी ठरले आहे. या चाचणीत 99 टक्के सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. चाचणीदरम्यान हे देखील समोर आले की, उंदरांनी औषध घेणे बंद केल्यावर त्यांची प्रजनन क्षमता परत येत होती. हे औषध शरीरात काही विशिष्ट संकेत देऊन शुक्राणूंचे उत्पादन तात्पुरते थांबवते. आपल्या शरीरात रेटिनोइक ॲसिड रिसेप्टर अल्फा (Retinoic Acid Receptor Alpha) नावाचे एक प्रोटीन असते, जे शरीरात शुक्राणूं तयार करतात. हे औषध याच प्रोटीनला काही काळासाठी थांबवते, ज्यामुळे काही काळासाठी शरीरात शुक्राणूंचे उत्पादन थांबते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com