Nashik News : 'तुला आम्ही रागावणार नाही'; वडिलांच्या 'त्या' वागण्याचा राग, मुलगा 12 दिवसांपासून बेपत्ता 

आम्ही तुझी खूप वाट बघत असल्याची हाक अथर्वच्या आईने NDTV च्या माध्यमातून दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Crime News : सध्या मुलांना कोणत्या गोष्टीचा कधी राग येईल हे काही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या कलेनं घ्यावं लागतं. मात्र पालकांना प्रत्येक वेळी समजून घेणं जमतंच असं नाही. अनेकदा त्यांचाही राग अनावर होतो. मात्र यावर घर सोडणं हा उपाय नसतो. अनेकदा मुलांनाही आई-वडिलांची बाजू समजून घेणं आवश्यक असतं. अशातच वडिलांनी रागावल्याच्या रागातून एक १८ वर्षीय मुलाने घर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील ओमकार नगरमध्ये राहणारा अथर्व लक्ष्मण पाचपिंडे हा 18 वर्षांचा बारावी CET चे शिक्षण घेणारा मुलगा गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असल्याने पाचपिंडे कुटुंबीय सध्या प्रचंड तणावात आहेत. 25 ऑगस्ट रोजी अथर्व घरात मोबाइल पाहत असतानाच वडिलांनी त्याच्या हातातून मोबाइल ताब्यात घेतला होता आणि त्यानंतर दोन दिवसांनी 27 ऑगस्टला मी मित्राकडे जातो असं बहिणीला सांगून तो घरातून जसा निघून गेला तसा तो घरी परतलाच नाही. 

नक्की वाचा - Crime News : संभाजीनगरात MD विकणाऱ्या पेडलरच्या घरावर छापा; ड्रग्सऐवजी असं काही दिसलं की पोलिसही हैराण!

अथर्वचे आई वडील दोघेही पेशाने शिक्षक असून त्यांचा तो एकुलता एक आहे. म्हसरुळ पोलीस ठाण्यात याबाबत वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांकडूनही अथर्वचा सर्वत्र शोध घेतला जातोय. दरम्यान मोबाईल न दिल्याने अथर्वला राग आला असावा असा कुटुंबियांना संशय असून तुला आम्ही रागावणार नाही तू जिथे असशील तिथून घरी निघून ये... आम्ही तुझी खूप वाट बघत असल्याची हाक अथर्वच्या आईने NDTV च्या माध्यमातून दिली आहे. 

Topics mentioned in this article