VIDEO: ज्वेलर्स दुकानात थरार! चोरट्यांनी पिस्तूल दाखवलं, तरीही ती भिडली, दोघांनी 6 जणांना अक्षरश: पळवून लावलं

दागिने लुटण्याचा प्रयत्न करताच व्यावसायिक महिला नयना पगारिया आणि कर्मचारी अमित यांनी धाडसाने प्रतिकार केला, जोरदार झटापट झाली आणि अखेर दरोडेखोरांनी दुकानातून पळ काढला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Theft CCTV Footage: नाशिकच्या हिरावाडी या भरवस्तीतील न्यू समृद्धी ज्वेलर्स शॉपमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र दुकानातील कर्मचाऱ्यांच्या हुशारीमुळे दरोडेखोरांनाच पळ काढावा लागला. पिस्तूल घेऊन आलेल्या चार दरोडेखोरांशी दुकानातील दोन कर्मचाऱ्यांनी दोन हात केले, यावेळी जोरदार झटापट झाली अन् चोरट्यांना अक्षरश: पळा काढावा लागला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे.

NEET Paper Leak: ब्युटी पार्लरवाली मनिषा कशी झाली पेपर लीक रॅकेटची सुत्रधार? सावज हेरुन करायची शिकार

दरोड्याचा प्रयत्न फसला, कर्मचाऱ्यांनी पळवून लावले 

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या न्यू समृद्धी ज्वेलर्स शॉपमध्ये काल रात्री 9 वाजेच्या सुमारास एक थरारक घटना समोर आली आहे. दुकान बंद करतेवेळी अचानक डोक्यात टोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावलेली दरोडेखोरांची एक टोळी दुकानात शिरली. दुकानात महिला व्यावसायिक आणि दोन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरोडेखोरांनी पिस्टलचा धाक दाखवत दागिने लुटण्याचा प्रयत्न करताच व्यावसायिक महिला नयना पगारिया आणि कर्मचारी अमित यांनी धाडसाने प्रतिकार केला, जोरदार झटापट झाली आणि अखेर दरोडेखोरांनी दुकानातून पळ काढला.

Advertisement

कर्मचारी अमित याच्या डोक्यात एका दरोडेखोराने पिस्टलच्या मुठीने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एकुण 6 दरोडेखोर दुचाकीवर आले होते असा संशय व्यक्त केला जात असून आरोपींच्या शोधासाठी पोलीसांची पथके रवाना झाली आहेत. 

दाट लोकवस्तीच्या बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून, दरोडेखोरांना लवकरच अटक केली जाईल, असा दावा केला आहे. नाशिकमधील या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, कोट्यवधी रुपयांचा संभाव्य दरोडा टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे.