Nashik News: पत्नीचे इंस्टाग्रामवर चॅट, पतीचा राग अनावर, भर रस्त्यात तिच्या सोबत त्याने...

राजीव गांधी भवन परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर हल्ला केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

इंस्टाग्रामवर चॅट करणे एका पत्नीला महागात पडलं आहे. ती चॅट करत असताना तिच्या पतीने पाहीलं. त्यानंतर त्याला राग अनावर झाला. या रागाच्या भरात त्याने पत्नी सोबत भयंकर कांड केला. ही घटना नाशिकच्या राजीव गांधी भवन परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. भर रस्त्यात पतीने पत्नी सोबत अतिशय विचित्र कृत्य केलं. या घटनेची पोलीसांनी दाखल घेत पती विरोधात तातडीने कारवाई केली आहे.   

राजीव गांधी भवन परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर हल्ला केला. तिला भररस्त्यात बेदम मारहाण केली. ऐवढचं काय तर पत्नीच्या अंगावर थेट फॉर्च्युनर कार घातली. त्यातून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. पतीने केलेल्या या कृत्याने पत्नीही हादरून गेली आहे. पतीने आपल्या सोबत असं का केलं असा प्रश्नच तिला पडला आहे. या घटनेची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Ashok Kharat: अशोक खरातच्या संपर्कात 'त्या' 8 महिला, त्यांच्यासोबत सध्या काय घडतयं? धक्कादायक माहिती समोर

याबाबत सविस्तर वृत्त असं की पत्नी इंस्टाग्राम चॅट करत होती. हे पतीला पसंत पडले नाही. त्यातून पतीचा संताप अनावर झाला. त्याने पत्नीला मारण्याच्या उद्देशाने गाडीत बसवले. पण पत्नीने जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर ही त्याने तिच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तिची मदत केली. त्यामुळे तिचा जिव वाचला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार पती समीर पठाण नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे.


Topics mentioned in this article