जाहिरात

Ashok Kharat: अशोक खरातच्या संपर्कात 'त्या' 8 महिला, त्यांच्यासोबत सध्या काय घडतयं? धक्कादायक माहिती समोर

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडितांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे. तसेच अनेक पिढितांना नैराश्य व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Ashok Kharat: अशोक खरातच्या संपर्कात 'त्या' 8 महिला, त्यांच्यासोबत सध्या काय घडतयं? धक्कादायक माहिती समोर

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Ashok Kharat Case:  नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात अश्लील कांड प्रकरणात नवनवे खुलासे होत असून खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. एकीकडे भविष्य सांगण्याच्या नावाखाली शेकडो महिलांचे शोषण केल्याचे उघड  झाले असतानाच खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचाही आरोप होत आहे. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे. 

Viral News:'बहीण-लेकींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची मान कापून टाकू', हिंदूत्ववादी नेत्याचे प्रक्षोभक विधान

 खरात प्रकरणातील महिलांना मानसिक धक्का...

अशोक खरात प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचे समोर आले आहे. खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे अनेक व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहेत. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. यापैकी आठ ते नऊ महिलांनी मानसोपचार तज्ञांची अपॉइंटमेंट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडितांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे. तसेच अनेक पिढितांना नैराश्य व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. 

दुसरीकडे, भोंदू अशोक खरात हा आपले हवाला रॅकेट एका मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून खरात आपले हे हवाला रॅकेट चालवत होता. दिवसाला तब्बल 25 हजार रुपये भाडे असलेला हा विशेष सुट ३६५ दिवसांसाठी बुकिंग असायचा, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  याच हॉटेलमध्ये बसून अशोक खरात हा कोट्यवधी रुपयाची देवाण-घेवाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या हवाला रॅकेटचे दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. 

Pune News: बारामतीचा गुंता वाढला! मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर 'हा' OBC नेता निवडणूक रिंगणात उतरणार

मुलगा हर्षवर्धन खरातही फरार 

दरम्यान, भोंदू अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन खरात फरार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हर्षवर्धन खरात नाशिक शहरातून फरार झाला आहे. हर्षवर्धन खरात याचा मोबाईल बंद असल्याने अधिकारी तृप्तबाला निवासस्थानी पोहोचले होते, मात्र तो त्या ठिकाणी मिळून न आल्याने आता पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात देखील फरार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com