निलेश वाघ, नाशिक: सोलापूर जिल्ह्यातील पिलीवमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असतानाच आता नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी प्रेमसंबंधाला विरोध केल्याने प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची भयंकर घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यात घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विवाहबाह्य प्रेमसंबंधांबद्दल वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर श्री.शनिदेव मंदिराजवळ घडली.आत्महत्या करण्यापूर्वी या प्रेमी युगुलाने भावनिक सुसाईट नोट लिहिली असून त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 16 जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाडजवळच्या वंजारवाडी गावात राहणाऱ्या उज्ज्वला रामकृष्ण खताळ गावातील ज्ञानेश्वर माधव पवार यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, नातेवाईक गावातील काही लोकांचा त्यांच्या प्रेमसंबधाला विरोध होता.त्यातून आत्महत्या करा ' अन्यथा ठार मारू अशी आमच्या मागे आमदार व माजी आमदार संजय पवार व अधिकारी असल्याच्या धमक्या वारंवार दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा केल्याचे या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.
(नक्की वाचा- MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
दरम्यान, आमदार साहेब तुमची बहीण मारली या लोकांनी " याची सखोल चौकशी करावी अशी भावनिक साद देखील या सुसाईट नोटमध्ये घालण्यात आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.