Nashik News : नाशिकच्या TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. टीसीएसच्या कंपनीच्या आवारातच हा संपूर्ण धर्मांतराचा प्रकार सुरू होता अशी माहिती पोलिसांच्या आरोपपत्रातून समोर आली आहे. टीसीएसच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर असलेला कॅफे हा फक्त चहा कॉफी पिण्याचं ठिकाण नव्हतं. तर तो धर्मांतराचा कट रचण्याचा मुख्य अड्डा बनला होता. दानिश, निदा, तौसिफ कॅफेत बसून वेळोवेळी एकत्र भेटून धर्मांतरबाबत प्लॅन करत होते. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी तौसिफ अत्तारने हा संपूर्ण धर्मांतराचा प्रकार कॅफेत सुरु असल्याचं कबुल केलं आहे.
टीसीएस कॉर्पोरेट जिहादप्रकरणात पोलिसांकडे डिजिटल पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर केला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मोबाइलमध्ये 37 इस्लामिक ऑडिओ फाईल्स आढळून आल्या आहेत. मुस्लीम धर्माशी संबंधित अॅपही इन्स्टॉल करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इस्लाम धर्माशी संबंधित ऑडियो क्लिपचा मोठा साठा
नाशिकच्या बहुचर्चित कॉर्पोरेट जिहादप्रकरणात पोलिसांच्या हाती आता भक्कम आणि तांत्रिक पुरावे लागले आहेत. पीडितेला धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींकडून डिजिटल साधनांचा वापर केला जात होता. कारण पीडितेच्या मोबाइलची तपासणी करताना पोलिसांना इस्लाम धर्माशी संबंधित ऑडिओ क्लिप्सचा मोठा साठा सापडला आहे. यात जवळजवळ 37 इस्लामिक ऑडिओ क्लिप्स आढळून आल्या आहेत. इतकंच नाही तर पीडित मुलीच्या मोबाइलमध्ये यू ट्यूब लिंक्स तसंच मुस्लिम धर्माशी संबंधित चार मोबाइल अॅप्स सापडले आहेत. दानिश आणि निदा यांनीच हे अॅप इन्स्टॉल करण्यासाठी सांगितल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे.