Nashik Dargah case : दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik encroachment dargah demolished : नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. नाशिक शहरात दर्ग्यावरुन जी घटना घडली त्यात कठोर कारवाई केली जात असल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणात आतापर्यंत 57 संशयित आरोपी आढळले असून 25 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे. कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने केला होता. या हल्ल्यात 21 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता

नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?


नाशिक शहरात दर्ग्या हटवण्यासंदर्भात ती घटना घडली त्यात कठोर कारवाई केली जात आहे. या जागेवर 15 जणांना अटक करण्यात आलं होतं. या गुन्ह्यात 54 जणांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये अधिक नावं समोर येत आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईप्रकरणात लोकांची माथी भडकवी जात असल्याची माहिती आम्हाला 2 दिवसांपासून मिळत होती. या प्रकरणात आम्ही राजकीय पार्श्वभूमी पाहत नाही. 1400 ते 1500 लोकांचा जमाव होता. 21 पोलीस जखमी असून अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. तपासी पथक, सायबर पोलीस कारवाई करत आहे. काही लोक माथी भडकविण्याचे काम करीत असतात. उद्योग करत असतात, आपण त्यांना रोखत असतो. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सक्षम कारवाई केली जात आहे. आम्ही पूर्वनियोजित काळजी घेतली होती, त्यामुळे घटना पुढे मोठी झाली नाही.
 

Advertisement