जाहिरात
This Article is From Sep 18, 2024

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक हादरलं; लेकीला विष पाजून झोपवलं अन् कुटुंबाचाही शेवट!

एक दिवस आधी ते त्र्यंबकेश्वरला देवदर्शनाला गेले होते. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 18 सप्टेंबरला पहाटे हा प्रकार घडला.

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक हादरलं; लेकीला विष पाजून झोपवलं अन् कुटुंबाचाही शेवट!
नाशिक:

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमधून (Shocking News from Nashik) हादरवणारी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये आई-वडिलांसह एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

विजय माणिक सहाने (38, ज्ञानेश्वरी विजय सहाने (29), अनन्य विजय सहाने (9) अशी तिघांची नावं आहेत.  सहाने कुटुंबीय मूळचे गौळणे गावचे आहे. मात्र सध्या ते  पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास होते.  इंदिरानगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.  दरम्यान ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याने आधी नऊ वर्षांच्या मुलीला विष पाजलं यानंतर तिला बेडवर झोपवलं. यानंतर दोघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना आज पहाटे घडली. एक दिवस आधी ते त्र्यंबकेश्वरला देवदर्शनाला गेले होते. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 18 सप्टेंबरला पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. 

शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 2 तास मिरवणुकीचा खोळंबा

नक्की वाचा - शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 2 तास मिरवणुकीचा खोळंबा

आज सकाळी शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी खाली आली होती. ती खाली आली नव्हती. म्हणून तिला पाहण्यासाठी आजोबा वरच्या मजल्यावर गेले तेव्हा घराचं दार आतून बंद होतं. त्यांनी दुधवाल्याच्या मदतीने आतून दार उघडलं. तेथे तिघांचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. समोर आलेल्या माहितीनुसार, सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. तर त्यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम, सोनं हे सगळं तसंच होतं. त्यामुळे पोलिसांकडून आत्महत्या करण्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.