Jalgaon Crime : शाळा हे विद्येचं मंदिर असतं. शाळेत दिलेल्या शिकवणीतून विद्यार्थी भविष्यात चांगला माणूस म्हणून उभा राहू शकतो. मात्र चाळीसगावमधील एका शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकच घोटाळा करीत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या (National Urdu High School) धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Sangli News: जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल, कारण आलं समोर
मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल उर्दू हायस्कूलकडून 20% पगार शासन अनुदानित असताना 100% पगार शासन अनुदान निर्णय झाल्याची खोटी प्रत सादर करण्यात आली. याअंतर्गत शाळेने तब्बल 11 लाख 50 हजार रुपये लाटल्याचे उघडकीस आलं आहे. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक सलीम खान यांच्यासह 8 शिक्षकांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.