जाहिरात

Sangli News: जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल, कारण आलं समोर

ही कामे करताना त्याने हात उसने आणि सावकारांच्याकडून पैसे घेतले होते. त्याची परतफेड कशी करायची याचाच विचार तो सतत करत होता.

Sangli News: जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल, कारण आलं समोर
सांगली:

जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्या मागचे कारण ही समोर आले आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी इथं घडली आहे. या गावातील तरुणी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ते 35 वर्षांचे होते. धडाडीचा तरुण कंत्राटदार म्हणून त्याची ओळख होती. पण त्याच्या नशिबी भलतीच गोष्ट आली आणि त्याला आपले जिवन संपवावे लागले. 

जल जीवन मिशन योजनेच्या कामाचे कंत्राट त्याला मिळाले होते. ते काम त्याने स्वत:चे पैसे लावून पूर्ण केले. सरकारकडून बीलाचे पैसे मिळतील आणि कर्ज फेडू असा हिशोब त्याने केला होता. त्यामुळे मोठी कंत्राटं  त्याने घेतली होती. मिळालेली कामं त्याने वेळेत पूर्ण केली. त्यानंतर त्याला सरकारकडून केलेल्या कामाची बीलं मिळतील अशी अपेक्षा होती. पण जवळपास एक वर्ष झाले तरी कामाचे पैसे मिळाले नाहीत. दुसरीकडे व्याज वाढत होते. त्यामुळे हर्षल प्रचंड दबावा खाली होती. पैसे मिळाले नाहीत तर काय होणार हा प्रश्न त्याला सतावत होता.  

नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?

केलेल्या कामाचे 1 कोटी 40 लाखांची रक्कम शासनाकडे थकीत होती. येवढी मोठी रक्कम त्याची अडकून होती. त्यामुळे तो दबावाखाली होता. त्याचे ऐवढे पैसे गुतवून अडकून पडले होते. बिले वेळेत मिळत नसल्याने तो खचला होता.  मानसिक त्रासाला ही तो कंटाळला होता. या त्रासाला आणि टेन्शनला कंटाळून स्वतःच्याच शेतात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय त्याच्या कुटुंबीयांनाही त्याने केलेल्या या कृती मुळे धक्का बसला आहे.  

नक्की वाचा - Food News: केळी खाणे कोणी टाळावे? 'या' लोकांसाठी केळी आहेत विषसमान, डॉक्टरांनी काय सांगितलं?

ही कामे करताना त्याने हात उसने आणि सावकारांच्याकडून पैसे घेतले होते. त्याची परतफेड कशी करायची याचाच विचार तो सतत करत होता. ही बीलं मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद भोसले  यांनी केला आहे. या प्रकरणी कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील अधिक तपास करत आहे. शिवाय  आत्महत्या नेमकी का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दूरध्वनी द्वारे दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com