Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली!

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील तळोजामध्ये भर दिवसा एका महिलेचा कारनं पाठलाग करुन तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवण्यात आलं. तसंच तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai Crime News: भर दिवसा घडलेल्या प्रकारामुळे नवी मुंबईत भीतीचं वातावरण आहे. (प्रतिकात्मक फोटो/AI)
नवी मुंबई:


राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime News:  मुंबई जवळचं योजनाबद्ध पद्धतीनं विकसित शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. या नियोजनबद्ध शहरातही गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. नवी मुंबईतील तळोजामध्ये भर दिवसा एका महिलेचा कारनं पाठलाग करुन तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवण्यात आलं. तसंच तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे. कुंदन नेटके, असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण, अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 28 जून रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडला. त्या दिवशी संबंधित महिला मेट्रो स्थानकाकडे जात असताना आरोपी कुंदन नेटके याने आपल्या कारमधून तिचा पाठलाग केला. त्याने कार थांबवून पीडितेला काही बोलायचं आहे असं सांगून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. 

त्यानंतर त्याने तिच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केली. मात्र, पीडितेने त्याला ठाम नकार दिल्यावर आरोपीने संतापून स्वतःकडे असलेली रिव्हॉल्वर काढली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Navi Mumbai : 14 वर्षांपासून फरार खूनाचा आरोपी अखेर जेरबंद, वाचा कशी झाली कारवाई? )
 

पीडित महिलेने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि तत्काळ तळोजा पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुंदन नेटके याच्याविरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता (Bharatiya Nyaya Sanhita - BNS) मधील कलम 75 (लैंगिक छळ) आणि कलम 351(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फूटेज, पीडितेचे जबाब, व घटनास्थळाची माहिती गोळा केली जात आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी आणि महिलांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article