Navi Mumbai Crime : 75 लाखांच्या सायबर फसवणुकीचा उलगडा; 1 चूक आणि 17 दिवसांमध्ये आरोपींना बेड्या

Cyber fraud case : नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याने अवघ्या 17 दिवसांत यशस्वी छडा लावून दोघा मुख्य आरोपींना अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी 

नोकरीच्या आमिषाने कंपनीच्या खात्यातून तब्बल 75 लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात उचलून केलेल्या सायबर फसवणूक प्रकरणाचा नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याने अवघ्या 17 दिवसांत यशस्वी छडा लावून दोघा मुख्य आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मालाडमधील एक पुरुष वाहन चालक आणि एक गृहिणीचा समावेश आहे. सध्या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 18 मे ते 19 मे 2025 दरम्यान, आरोपींनी संगनमत करून तक्रारदार यांच्या नोकरीच्या ठिकाणी कंपनीचे संचालक असल्याचा बनाव करत विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदार कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल 75 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणात, सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्र. २६/२०२५ नुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

( नक्की वाचा : सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले... )

कसा लागला छडा?

या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचे सखोल विश्लेषण केले. तपासात मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई येथील एका बँकेतून एक पुरुष आणि एका महिलेकडून फसवणुकीची रक्कम नकद स्वरूपात काढण्यात आली होती. त्यांची ही चूक तपासासाठी निर्णयाक ठरली. पोलिसांना त्यानंतर तांत्रिक तपासातून आरोपींची ठोस ओळख पटवण्यात यश आले.

Advertisement

तपासानंतर पोलीस पथकाने दिनांक 6 जून 2025 रोजी पहाटे मालवणी, मालाड येथून शाबाज आरीफ अन्सारी (वय ३०), व्यवसाय – वाहन चालक यास अटक केली. पुढील तपासात बिलकिस नसीम मोमीन उर्फ बिको (वय ४९), व्यवसाय – गृहिणी ही महिला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तिला देखील त्याच दिवशी दुपारी  अटक करण्यात आली.

न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपींचा शोध नवी मुंबई पोलिसांन कडून सुरू आहे.

सायबर गुन्हेगारीविरुद्ध सक्त कारवाईचा इशारा

नवी मुंबई पोलीसांनी पुन्हा एकदा सायबर गुन्हे करणाऱ्यांना दिला इशारा देत स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या फसवणुकीत सहभागी कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. तांत्रिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर पोलिसांकडून विशेष पथक आणि तांत्रिक उपायांचा प्रभावी वापर सुरू आहे.

Advertisement

नागरिकांना आवाहन 

कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत किंवा बँक माहिती शेअर करण्याआधी पूर्ण खातरजमा करा. शंका आल्यास तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन १९३० किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधा, असं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलं आहे. 


 

Topics mentioned in this article