Fraud News: 'टोरेस'नंतर आणखी एका स्कॅमने मुंबईत खळबळ! गुंतवणूकदाराला लाखोंचा चुना, प्रकरण काय?

टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

   राहुल कांबळे, नवी मुंबई: मुंबई येथील टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याने मुंबईकरांना मोठा धक्का दिला होता कारण या घोटाळ्यात मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये गुंतले आहेत. या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. एक्वा मरीन ग्लोबल कल्चर असे फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख राहणार अंधेरी यांच्या फिर्यादीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शेख हे मूळचे मुंबई अंधेरी शहरातील रहिवाशी आहे. शेख यांनी अंधेरीत असलेल्या एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीत जवळपास 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, गुंतवणूक करताना शेख यांना कंपनीने मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले होते, महिन्याला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 15 टक्के  परतावा देण्याचे आश्वासन दिले होते, गुंतवणूक केल्या नंतर,  शेख यांना दोन ते तीन महिने परतावा देखील मिळाला मात्र, परतावा  मिळणे बंद झाल्या नंतर.  शेख यांनी अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली, मात्र कंपनीकडून उत्तर मिळत नसल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यालय नवे मुंबईत आहे त्या कार्यालयात जाण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.

Advertisement

त्या नुसार शेख हे, खारघर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात गेले, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिल्या मुळे, शेख यांचे समाधान झाले नाही. त्या मुळे त्यांनी थेट स्थानिक पोलीस स्टेशन गाठून , कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली, शेख यांच्या तक्रारी नंतर, खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून, हा गुन्हा मुंबई अंधेरी एम आय डी सी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासला सुरवात करत मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस खारघर यांनी शुक्रवारी संयुक्त कारवाई करत या कंपनीचे मालक विनय कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. सद्या कांबळे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई पोलीस करत आहे.

Advertisement

नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्या नंतर,  खारघर पोलिसांनी हा गुन्हा अंधेरी एम आय डी सी पोलिसा कडे वर्ग करण्यात आला. एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग केल्या नंतर,  मुंबई पोलीस आणि खारघर पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून, कंपनीच्या मूळ मालक विनय कांबळे याला अटक केली आहे.

Advertisement