Navi Mumbai News: 200 कोटींच्या कर्जाचे आमिष, बडा उद्योगपती फसला, तब्बल सव्वा कोटीला मुकला

उद्योगपतीने त्यांना वारंवार संपर्क सुरू केला. तरी ही कर्ज मिळाले नाही. आरोपी टाळाटाळ करू लागले.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

एखाद्या उद्योगासाठी 300 कोटींच्या कर्जाची हमी देतो, असे सांगून एका 78 वर्षीय उद्योगपतीची तब्बल 1.25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांची एक टोळी यासाठी कार्यरत होती. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे. फसवणूक झालेल्या उद्योगपतीला डिसेंबर 2023 ते मार्च 2025 दरम्यान संपर्क करण्यात आला होता. धनेश देशमुख ,प्रमिला लाड, प्रशांत ऊर्फ राजू पिल्लई,आणि पुष्पा गुप्ते यांनी या उद्योगपतीवर जाळं फेकलं होतं. हे सर्व जण मुंबई आणि अजूबाजूच्या परिसरात राहाणारे आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या चौघांनी उद्योगपतीला  सुरुवातीला 100 कोटी आणि नंतर 200  कोटींच्या बिझनेस कर्जासाठी बनावट डिमांड ड्राफ्ट, चेक, बँकेचे शिक्के आणि खोटी सही असलेली कागदपत्रे पाठवली. ही कागदपत्रे ई-मेल, कुरिअर व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘प्रोसेसिंग फी', ‘प्रॉजेक्ट ऍप्रुव्हल', ‘बँक गॅरंटी', ‘स्टॅम्प ड्युटी' अशा विविध कारणांनी त्यांनी त्या  उद्योगपतीकडून  1.25 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर करून घेतले. पण खरे कर्ज मात्र कधीच मिळाले नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  Pune News: कोयत्याचा धाक, अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, भल्या पहाटे वारी मार्गावर भयंकर कांड

त्यानंतर उद्योगपतीने त्यांना वारंवार संपर्क सुरू केला. तरी ही कर्ज मिळाले नाही. आरोपी टाळाटाळ करू लागले. तेव्हा आपली  फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी 28 जून 2025 रोजी पोलिसांत या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू असून, बँक व्यवहार, बनावट कागदपत्रांची सत्यता आणि आरोपींचा आपापसातील संबंध तपासला जात आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: लहान मुलांच्या हाडांनी भरलेली बॅग, 'ते' दोघे अन् अंगावर काटा आणणारा खुलासा

याशिवाय, या उद्योगपतीचा या फसवेखोर टोळीशी संपर्क नेमका कसा झाला, तो ‘म्युट्युअल कॉन्टॅक्ट' कोणी होता, याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित होते की मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये कोणतीही आर्थिक खात्री न करता ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून पैसे ट्रान्स्फर करू नयेत. बनावट कर्जदाते, आर्थिक दलाल किंवा ‘फिनान्शियल सोल्युशन एजन्सीज'च्या भूलथापांना बळी न पडता कर्ज घेण्यापूर्वी त्या संस्थेची प्रतिमा, कागदपत्रे आणि आरबीआय रजिस्ट्रेशन तपासणे आवश्यक आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Viral video: पॉप स्टार शकिराचं गाणं, शिक्षिकेचा चिमुकल्यांसह भन्नाट डान्स, शिकवणीचा नवा ट्रेंड

कर्ज देणारे व्यक्ती किंवा संस्था बँक खात्यात थेट पैसे मागत असतील, तर तो सायबर गुन्हा असण्याची शक्यता अधिक असते. फसवणुकीच्या शिकार झाल्यास तत्काळ स्थानिक पोलीस किंवा सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.  www.cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. नवी मुंबई रबाळे एमआयडीसी पोलीस तपास करत असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील गुंतागुंतीचा सायबर गुन्हा लक्षात घेता पोलीस आर्थिक फॉरेंसिक तज्ज्ञांची मदत घेऊन आरोप सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.