
केरळमधील त्रिशूरमधून (Thrissur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादवून गेला आहे. त्रिशूरमधील पुथुक्कड पोलिस स्टेशन परिसरात रविवारी रात्री 12:30 च्या सुमारास एक तरुण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याच्या हातात एक बॅग होती. हा तरुणी बॅग घेवून का आला आहे असा प्रश्न पोलिसांना पडला. म्हणून त्यांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. पण काही सांगण्या आधीच त्याने ती बॅग पोलिसांच्या हातात दिली. ज्यावेळी पोलिसांनी ती बॅग उघडून पाहीली त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्या बॅगमध्ये चक्क लहान मुलांची हाडं होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या तरुणीने ही बॅग पोलिस स्थानकात आणली होती त्याचं नाव भाविन असं होतं. तो 25 वर्षाचा आहे. त्याच्याकडे पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने अंगावर काटा आणणार धक्कादायक खुलासा केला. ज्यामुळे पोलिसही आवाक झाले. भाविन हा अनीशा नावाच्या तरुणीच्या प्रेमात होता. ती 22 वर्षांची होती. ते दोघेही गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचे लग्न झाले नव्हते. या अनैतिक संबंधामुळे अनीशा दोनदा गर्भवती झाली. दोन्ही वेळा अनीशाने नवजात मुलांना जन्म दिला होता. पण त्यानंतर या दोघांनीही भयंकर कृत्य केलं होतं.
मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना लगेचच मारण्यात आले. भाविन आणि अनीशा 5 वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना भेटले होते. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना पहिले बाळ 6 नोव्हेंबर 2021 रोजी झाले होते. या घटनेनंतर अनीशालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी अनीशाने दावा केला की, बाळ मृत जन्माला आले होते. पण शवविच्छेदन आणि चौकशीनंतर बाळाला जन्मानंतर लगेचच मारण्यात आले होते हे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह घराच्या अंगणात पुरण्यात आला होता. आठ महिन्यांनंतर, अनीशाने स्वतः तो सांगाडा बाहेर काढला होता. त्यानंतर तो भाविनला दिला होता.
दुसऱ्यांदा 29 ऑगस्ट 2024 रोजी अनीशाने दुसऱ्या मुलालाही जन्म दिला. त्याच्या बरोबर तर या दोघांनी आणखी भयंक कृत्य केलं. पोलिसांनी सांगितले की, अनीशाने बाळाला जन्म दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी कपड्यात गुंडाळून भाविनच्या घरी पोहोचवले होते. भाविनने ते आपल्या घराच्या मागील बागेत गुपचूपपणे पुरले होते. काही महिन्यांनंतर तो मृतदेहही बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याची हाडे गोळा करून सुरक्षित ठेवण्यात आली होती. पोलिसांना दिलेल्या जबाबात भाविनने धक्कादायक दावा केला आहे. त्याने अनीशाला 'धार्मिक पूजेसाठी'हे अवशेष जपून ठेवण्यास सांगितले होते. पण खरे तर त्याला तिला ब्लॅकमेल (Blackmail) करायचे होते. जेव्हा अनीशाने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाविनने तिला धमकावण्यासाठी मुलांच्या अवशेषांचा आधार घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, भाविनने स्वतःच या भयानक कृत्याचा खुलासा केला आहे. त्याने हाडे पोलिसांना दिली आणि सर्व सत्य ही सांगितले. यानंतर पोलिसांनी अनीशालाही ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. हे प्रकरण केवळ हत्येचे नाही, तर ही एक अशी भयानक घटना आहे ज्यात प्रेम, अविश्वास, ब्लॅकमेल आणि क्रूरतेने दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. केरळ पोलिस आता या सनसनाटी प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी वैज्ञानिक आणि डिजिटल पुराव्यांवर काम करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world