राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल परिसरातील कासाडी नदी पुलावरुन एक सफेद रंगाच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट नदीत कोसळली. कारचालकाला क्रेटा गाडीने धडक दिली, यात कारचालकाचं नियंत्रण सुटून गाडी पुलाचं रेलिंग तोडून थेट २५ फूट कासाडी नदीच्या पाण्यात कोसळली.
कार थेट नदीत कोसळली...
नवी मुंबईतून एक धक्कदायक घटनेची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्ग खारघर नदी पुलावरुन एक सफेद रंगाच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि कार थेट नदी पात्रात कोसळली. क्रेटा कारने मागून धडक देऊन नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट कार पुलाचं रेलिंग तोडून थेट 25 फूट खाली कोसळली. शुक्रवार रात्री दहा वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Pune Navale Bridge Accident : मराठीतील हरहुन्नरी अभिनेता दगावला; वडिलांसाठी नवस करणाऱ्या स्वातीचाही मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने गाडीला पाण्यातून बाहेर काढले. या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांनी मृत व्यक्तीला जवळच्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र रोड पुलावरील या भीषण अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली आहे