जाहिरात

Naxal Lovestory: मुलीच्या वयाच्या नक्षलवाद्यावर प्रेम जडले, पोलिसांकडून आधी पत्नीचा खात्मा; आता मजनूचा गेम!

अरूणाला ओडिशामध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी ठार मारलं होतं. या चकमकीच्या आठ वर्षानंतर पोलिसांनी मजनू हृदयाच्या चलपतीलाची यमसदनी पाठवलं आहे.

Naxal Lovestory: मुलीच्या वयाच्या नक्षलवाद्यावर प्रेम जडले, पोलिसांकडून आधी पत्नीचा खात्मा; आता मजनूचा गेम!

छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर असलेल्या गरिआबंद जिल्ह्यातील चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेलेल्या चलपतीचा खात्मा करण्यात आला. चलपती हा अत्यंत हिंसक आणि भयंकर नक्षलवादी होता. जवळपास 30 वर्षे त्याने नक्षलवादी चळवळ आपल्या ताब्यात ठेवली होती. मात्र छत्तीसगडमधील चकमकीत त्याचा अखेर शेवट झाला. चलपतीच्या मृत्यूनंतर त्याची लवस्टोरीही आता चर्चेत आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चलपती हा आंध्र प्रदेशातील चिंतूर जिल्ह्यातील मातेमपल्लीचा रहिवासी होता.  जयराम उर्फ ​​चालपतीने गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं होतं. 10 पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तो नक्षलवादी चळवळीत घुसला होता. 10 वी पर्यंत शिकलेला असल्याने त्याला थेट सेंट्रल कमिटीत स्थान देण्यात आले होते. चलपती सुरुवातीपासूनच तांत्रिकदृष्ट्या इतरांपेक्षा उजवा होता. गेल्या काही वर्षात त्याने नक्षल चळवळीमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. सुरुवातीला त्याच्या डोक्यावर 20 लाखांचे इनाम होते जे नंतर वाढवून 1 कोटी करण्यात आले होते. छत्तीसगड-ओरिसातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चलपती मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता. 

चलपती हा इतका मोठा झाला होता की त्याच्या सुरक्षेसाठी 10- 12 नक्षलवादी तैनात होते. यामध्ये नक्षलवाद्यांमधील कमांडरचाही समावेश होता. चलपती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि त्याच्याकडे छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. तंत्रज्ञानाची आवड असलेला नक्षलवादी म्हणून त्याची ओळख होती. या चलपतीला पोलिसांनी मंगळवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. 60 वर्षीय चलपतीकडे एके-47 , मोबाइल, टॅबलेट आणि रेडिओ सापडल्याचे कळते आहे. चलपती हा कुख्यात नक्षलवादी म्हणून ओळखला जायचा. तरुणांची माथी भडकावून त्यांना नक्षलवादी चळवळीत ओढण्याचे काम तो करत होता.  

( नक्की वाचा : जोडप्यांमध्ये वेगानं लोकप्रिय होत असलेला Sleep Divorce काय आहे? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो? )

नक्षलवादी रामकृष्ण याने चलपतीला नक्षल चळवळीत ओढले होते. चलपती हुशार आहे हे पाहून रामकृष्णला आपला सहाय्यक बनवला होता. नंतर त्याच्याकडे आंध्र प्रदेश आणि ओडीशा या दोन विभागांची जबाबदारी देण्यात आली होती. हल्ल्याचे नियोजन करण्याचे कौशल्य चलपतीने प्राप्त केले होते. हल्ला कुठे आणि कधी करायचा याचे नियोजन तो करत होता. 

मुलीच्या वयाची तरुणी आवडली!
आपल्या वयापेक्षा अर्धे वय असलेली एक तरुणी चलपतीच्या पाठीपुढे करत होती. अरुणा असं या तरुणीचं नाव होतं. तिला पाहून चलपती उन्हात चॉकलेट वितळावं तसा पाघळला होता. अरुणाशी लग्न करणारा चलपती आता अरुणापती झाला होता.  या मजनूगिरीमुळे चलपतीला नक्षलवादी चळवळीतून हाकलून देण्यात आलं होतं. 16 वर्षापर्यंत चलपती आणि अरूणाचं लग्न टीकलं होतं.

चलपती आत्मसमर्पण करणार अशा अनेकदा बातम्या आल्या मात्र त्या खऱ्या ठरल्या नाही. कालांतराने तो पुन्हा नक्षलवादी चळवळीत सक्रीय झाला. अरूणाला ओडिशामध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी ठार मारलं होतं. या चकमकीच्या आठ वर्षानंतर पोलिसांनी मजनू हृदयाच्या चलपतीलाची यमसदनी पाठवलं आहे. छत्तीसगडमधील कुल्हाडीघाट येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी चलपतीला ढगात पाठवलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: