संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता CID चौकशीने वेग घेतला आहे. तपास जलदगतीने होत आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या लोकांची चौकशी ही केली जात आहे. त्यात पक्षाच्या काही नेत्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यात आज रविवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणे यांना ही चौकशीसाठी सीआयडीने समन्स पाठवले होते. त्यांना चौकशीला बोलावल्याने सर्वांच्यात भूवया उंचावल्या होत्या. त्यांची तब्बल 7 तास सीआयडीने चौकशी केली. त्यानंतर त्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर बोलताना आपल्याला का बोलवले होते आणि काय विचारणा करण्यात आली याचा खुलासा सोनावणे यांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संध्या सोनावणे या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या पक्षाच्या सक्रीय नेत्या आहेत. त्यांचा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वावर आहे. शिवाय या प्रकणातील मुख्य आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबधित आहेत. या सर्व गोष्टी पहाता सीआयडीने अनेक जणांची चौकशी सुरू केली आहे. त्यात पक्षाच्या काही नेत्यांना ही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यात संध्या सोनावणे यांचाही समावेश होता. सीआयडीने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली. आपण पक्षाचे काम करतो. त्यामुळे नेत्यां बरोबर संपर्क येतो. अशा वेळी सीआयडीला आपल्याला काही तरी विचारायचं असेल त्यामुळे बोलावले होते असं सोनावणे यांनी चौकशीनंतर सांगितले.
आपल्या बरोबर पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांचही चौकशी केल्याचं त्यांनी सांगितलं. चौकशीनंतर त्या नरवस वाटत होत्या. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता आपण नरवस नाही. दुपारी 12 वाजल्या पासून आपण इथं आहोत त्यामुळे असं वाटत आहे अशी सारवा सारव त्यांनी यावेळी केली. यापुढे जरी आपली चौकशी करायची असल्यास आपली तयारी आहे. सरकारी यंत्रणांना आपण मदत करण्यास तयार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजकारणात असल्यामुळे नेते कार्यकर्ते यांच्या बरोबर संबध येत असतात. त्याची माहिती सीआयडीला मिळाली असेल. त्यामुळेच त्यांनी आपल्याला चौकशीला बोलावलं होतं असंही त्या म्हणाल्या.
काय काय विचारलं याबाबत आपण काही सांगू शकणार नाही. चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाही. सात तास चौकशी झाली असं नाही. माझ्या आगोदरही काहींची चौकशी झाली आहे. आपल्या आधी आठ जणांची चौकशी झाली. पक्षात काम करत असताना काय कधी संपर्क आला. भेटीही झाल्या. यावरून काही प्रश्न विचारले गेले असं ही सोनावणे यांनी सांगितले. याबाबत प्रशासनाला काही माहिती मिळाली होती. त्यामुळे आपल्याला चौकशीसाठी बोलावलं होतं असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच चौकशीचा सपाटा लावला आहे. एकीकडे चौकशी सुरू असताना दुसरीकडे मात्र पुरावे ही सीआयडीची टीम गोळा करत आहे. हत्येसाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला होता ती ताब्यात घेण्यात आली आहे. त्यात दोन मोबाईल फोन ही मिळाल्याचं समजत आहे. त्यातून काही पुरावे मिळतात का याची चाचपणी केली जात आहे. शिवाय त्या फोन वरून कुणा कुणाला फोन केले गेले होते तो डाटा मिळवण्याचाही प्रयत्न सीआयडीचा असल्याचे समजत आहे.