जाहिरात

Kidnapping News: 3 शाळकरी मुलींचे अपहरण, कोरियाला पळण्याचा प्लॅन, सत्य जाणून सर्वच हादरले

या तिनही मुली उमरगा तालुक्यातील निलुनगर तांड्यावर राहणाऱ्या आहेत.

Kidnapping News: 3 शाळकरी मुलींचे अपहरण, कोरियाला पळण्याचा प्लॅन, सत्य जाणून सर्वच हादरले
धाराशिव:

तिन शाळकरी मुलींचे अपहरण झाले आहे. त्यांना वाचवा असा फोन पोलिसांनी येतो. हा फोन त्या तिन मुलीं पैकी एका मुलीच्या वडीलांनी पोलिसांना केला असतो. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता. पोलिस सुत्र हवतात. त्या मुलींचे लोकेशन ट्रेस केले जाते. त्या कुठे आहेत हे समजल्यानंतर त्यांनी ताब्यात घेतले जाते. पण त्यानंतर जे सत्य समोर येतं त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. तर पोलिसही अशा केसने अचंबित झाले आहेत. सर्वांनाच चक्रावून टाकणारी ही घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथं घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उमरगा तालुक्यात तुतोरी हे गाव आहे. या गावात ज्ञानेश्वर विद्यालय आहे. या विद्यालयात शिकणाऱ्या तिन मुलींचे अपहरण झाले आहे. त्यांच्या मानेवर चाकू ठेवून त्यांना एका पिवळ्या रंगाच्या गाडीतुन नेण्यात आले आहे. त्यांना वाचवा अशी मदत मागणारा फोन उमरगा पोलिसांना आला होता. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती तुम्हाला कुणी दिली अशी विचारणा केलीय. त्यावर आपल्या मुलीनेच फोन करून हे सांगितलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्या मुलीचे मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आले. ते मोहोळ इथं दाखवले गेले. त्या पुणे बसमध्ये असल्याचं पोलिसांनी समजलं. तिथेच त्यांना अडवण्यात आलं. नंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...

हा प्रकार इथेच थांबत नाही. इथून खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रकरणावरून पडदा उठतो. त्या मुलींकडे अपहरणाबाबत पोलिस विचारपूस करतात. त्यावेळी त्यांच्या समोर धक्कादाय खुलासा या तिन अल्पवयीन मुली करतात. या तिन ही मुली BTS-V ह्या कोरियन सिंगर आणि डान्स ग्रुपच्या चाहत्या होत्या. काही करून त्यांना या सिंगरची भेट घ्यायची होती. त्यासाठी या तिघींनी कोरियाला जाण्याचा प्लॅन केला होता. पण जायचं कसं असा त्यांच्या पुढे प्रश्न होता. अशा वेळी या तिघींनी मिळून एक प्लॅन केला. हा प्लॅन खतरनाक होता. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: आधी प्रेम केलं मग हत्या! तो सुटलाच होता, पण डी मार्टच्या पावतीमुळं अलगद अडकला

हा प्लॅन त्यांनी स्वत:च्याच अपहरणाचा रचला होता. त्या आधी या तिघींनी घरातून पैसे चोरी केले. पाच हजार रूपयांची त्यांनी चोरी केली.  उमरगा ते पुणे जायचे असं ठरवलं. पुढे पुण्यात जाऊन पैसे कमवायचे. त्यानंतर तिथून दक्षिण कोरियाला जायचं.  तिथे त्या सिंगर ग्रुपला भेटायचे असा प्लॅन केला होता. त्यानुसार त्यांनी बस पकडली. त्या आधी आपले अपहरण झाले आहे असं घरच्यांना कळवलं. तिथून त्या पुण्याच्या दिशेने निघाल्या. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना अवध्या अर्धा तासाच्या आता परत त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं. 

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID च्या हाती काय लागलं? तपासाला आला वेग

या तिनही मुली उमरगा तालुक्यातील निलुनगर तांड्यावर राहणाऱ्या आहेत. उमरगा पोलीसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या 30 मिनिटाच्या आत या 3 अल्पयीन मुलीच्या अपहरणाचा बनाव उघड केला. त्यांच्या या कृती मुळे या मुलींचे पालक हादरून गेले आहेत. मुलींनी कट रचला. घरातून पळ काढला. अपहरणाचा बनाव ही केला. त्या आधी घरी चोरी केली. ऐवढ्या लहान वयात मुलींनी हे काय केलं यामुळे पालक आवाक झाले आहेत. तर पोलिसही चक्रावून गेले आहेत. या अपहरणाच्या बनावाची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com