Akola News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहीलं, NEET ची तयारी करणाऱ्या अकोल्यातील 2 तरुणांचं टोकाचं पाऊल

अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या 2 विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शिक्षणाचा वाढता बोजा सहन होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. देशात स्पर्धा परीक्षांचे पेव वाढत आहे. त्यात वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, पिअर प्रेशर यांसारख्या अनेक कारणांमुळे तरुणांवरील ताण वाढत आहे. याच ताणातून अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या 2 विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. देशातील तरुण पिढी अभ्यासातून स्वत:चा जीव घेत असेल तर ही चिंतेची बाब आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

17 वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि 18 वर्षीय अर्णव नागेश देबाजे असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं आहे. पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील रहिवासी आहे. तो अकोल्यातील न्यु अकॅडमी येथे शिकवणी वर्षात होता. तर अर्णव देबाजे हा अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील रहिवासी. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते. दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीट हे त्याचं पहिलं पाऊल असतं. अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. सरकारी मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी नीटची परीक्षा महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे विद्यार्थी जीव तोडून यासाठी मेहनत करीत असतात. 

Advertisement

महत्त्वाचं...

नैराश्याशी एकट्याने लढू नका, कोणाची तरी मदत घ्या..
तुमच्या आजूबाजूला कोणी नैराश्याचा सामना करीत असेल तर त्यांना काही हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून काही प्रमाणात मदत केली जाऊ शकते. 

आसरा 
हेल्पलाइन नंबर - 91-22-27546669
मुंबईस्थित या एनजीओ आसरा ही मानसिकदृष्ट्या त्रस्त किंवा नैराश्यात असलेल्यांना मदत करते. येथील अनेक प्रतिनिधी नैराश्यग्रस्त व्यक्तीशी संवाद साधत आणि त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात.

Advertisement

स्नेहा इंडिया फाऊंडेशन
हेल्पलाइन क्रमांक - 91-44-24640050
मानसिक त्रासात असलेले आणि आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या लोकांनी ही संस्था 24x7 सेवा देते.