जाहिरात

Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan News : कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती आता दोन मुलांची आई होऊन घरी परतली आहे.

Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan News : कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाली त्यावेळी अवघ्या नऊ वर्षांची होती. ती मुलगी अखेर घरी परतली आहे. बेपत्ता चिमुरडी घरी आल्यानं घरच्यांना आनंद होणे साहजिक होते. पण, घरी परतल्यानंतर तिनं जो खुलासा केला ते ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कल्याण पोलीस देखील हा प्रकार समजल्यावर धक्का बसला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील नभ वर्षांची मुलगी 2018 साली बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा शोध घेतला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांचा शोध देखील सुरु होता. मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. काही दिवसांपूर्वी तब्बल सात वर्षांनंतर ही मुलगी परतली. त्यावेळी ती दोन मुलांची आई झाली होती. गेल्या सात वर्षात काय घडलं हे सर्व तिनं सांगितलं. त्यावेळी सारेच हादरुन गेले. 

या मुलीनं सांगितलं की, 2018 मधील त्या दिवशी एका महिला आणि पुरुषाने फूस लावून तिला नेलं. त्यानंतर मध्य प्रदेशात एका व्यक्तीला विकले. त्या व्यक्तीने या 9 वर्षाच्या मुलीवर जवळपास दोन वर्षे लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर 2020 साली या मुलीला त्या व्यक्तीने साडे तीन लाख रुपयांना राजस्थानमधील दिनेश नट नावाच्या व्यक्तीला विकले.

दिनेश नट याने त्याच्या भाच्यासोबत विकेश सोबत मुलीचे लग्न लावले. या मुलीला दोन मुले झाली. मात्र नवऱ्यासोबत त्याचा मामा दिनेस नट हा देखील तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होता. कशीबशी ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटून घरी परतली. घरच्या लोकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन मुलगी पोलिस ठाण्यात पोहचली.

( नक्की वाचा : Kalyan : 'कल्याणच्या शाळेत महिला विश्वस्तांकडून अश्लील कृत्य सुरु' माजी नगरसेवकाचा खळबळजनक आरोप )
 

 डीसीपी अतुल झेंडे,  सिनिअर पीआय ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपासाकरीता चार पथके नेमली गेली. पोलिस अधिकारी स्वप्नील भुजबळ आणि विकास मडके यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. पोलिस आरोपींच्या शोधात आधी गुजरातमधील भुज येथे गेले. त्यानंतर उधमपूरला गेले. त्यानंतर माऊट आबूला गेले. माऊंट आबूच्या मांडवा पोलिस ठाण्याच्या हद्तीत अखेर एका डोंगरीवर आरोपी सापडला.

सात वर्षापासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी कल्याणला घरी आली. घरी आल्यानंतर तिने जो खुलासा केला तो ऐकून कुटुंबियांची पायाखालची जमीनच सरकली. ९ वर्षाच्या या मुलीचे २०१८ साली अपहरण झाले. अपहरणकर्त्याने या मुलीला मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला विकून टाकले. या व्यक्तीने तिच्यावर दोन वर्षे लैगिंक अत्याचार करुन या मुलीला राजस्थानमध्ये विकले. या मुलीसोबत एकाने लग्न केले. तिला दोन मुले झाले. मुलीवर नवऱ्ाचा मामा देखील लैगिंक अत्याचार करीत होता. अखेर अल्पवयीन मुलीचा नवरा आणि मामाला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या शाेधात पोलिसांना 2200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. 

2 आरोपी सापडले, 3 फरार

पोलिसांनी सर्वप्रथम अल्पवयीन मुलीचा नवरा विकेशला अटक केली. तो आता जेलमध्ये आहे. त्यानंतर त्याचा मामा दिनेश नटलाही अटक करण्यात आली आहे,  या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींचा शोध अद्या सुरु  आहे. मुलीचे अपहरण करणारे महिला आणि पुरुष आणि मध्य प्रदेशात या मुलाला ज्याने विकत घेतल, त्यांचा शोध अद्याप सुरु आहे. त्यांची नावंही अजून समोर आलेली नाहीत.  पोलिसांनी या आरोपींना शोधण्यासाठी ताकद लावली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com