नीट पेपर लीक प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात चार आरोपींचा कबुलीजबाबही समोर आला आहे. नीट परीक्षेच्या वादादरम्यान नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने आयोजित केलेली युजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला आणि हे प्रकरण तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
पहिल्या आरोपीने काय सांगितलं?
या प्रकरणातील आरोपी अनुराग यादव हा बिहारच्या समस्तीपूर येथील राहणारा आहे. त्यांने आपल्या कबुलीजबाबात सांगितलं की, तो कोटाच्या एलेन कोचिंग सेंटरमधून नीटच्या परीक्षेची तयारी करीत होता. त्याचे काका ज्युनियर इंजिनियर पदावर कार्यरत आहेत. एकेदिवशी त्यांनी फोन केला आणि 5 मे रोजी नीटची परीक्षा असल्याचं सांगितलं. ते कोटाहून घरी यायला सांगत होते. परीक्षेची सर्व सेंटिग झाल्याचही त्यांनी सांगितलं. यासाठी 30-35 लाखांमध्ये सेटिंग्ज केल्याची माहिती आहे. त्यानंतर अनुराग कोटाहून घरी परतला. अनुरागच्या काकांनी त्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी अमित आनंद याच्याजवळ सोडलं.
नक्की वाचा - बच्चू कडूंच्या पत्नीला कंत्राट, थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, प्रकरण काय?
येथेच त्याला नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आली. येथे उद्याच्या परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांची तयारी आदल्या रात्री करवून घेण्यात आली. अनुरागने पुढे सांगितलं की, त्याला डी.वाय.पाटील शाळेचं सेंटर आलं होतं. येथे तो परीक्षा देण्यासाठी गेला. त्यावेळी प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर तो हबकला. आदल्या रात्री दिलेले प्रश्नच त्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले होते. परीक्षा झाल्यानंतर अचानक पोलीस आले आणि त्यांनी मला पकडलं. यानंतर मी माझा गुन्हा स्वीकार केला, असं अनुराग सांगतो.
NEET परीक्षेमुळे राजकारणही तापलं...
बिहारच्या नीट परीक्षेवरून राजकारण तापलं आहे. नीट प्रश्न पत्रिका लीकचे कथित मास्टरमाइंड सिंकदर यादववरून भाजप आणि आरजेडी दोन्ही पक्ष समोरा-समोर आले आहेत.