नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हादरवणारा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका हॉटेलमध्ये पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये चार बहिणी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुलाला अटक केली आहे. आरोपीचं नाव अर्शद असल्याचं सांगितलं जात आहे. तो जवळपास 24 वर्षांचा आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Kalyan Crime : 'तू इथेच थांब, तुझी नजर उतरवून घेतो'; अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाचे मुलीशी अश्लील चाळे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदने धारदार ब्लेडने पाचही जणांची हत्या केली. सुरुवातील केलेल्या चौकशीत अर्शद वारंवार जबाब बदलत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. हे कुटुंब 30 डिसेंबरला लखनऊमध्ये फिरायला आले होते. हे कुटुंब नाका परिसरातील हॉटेल शरणजीतमध्ये थांबले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. मृतांमध्ये आलिया (9), अल्शिया (19), अक्सा (16), रहमीन (18) आणि अस्मा यांचा समावेश आहे. अस्मा या मुलींची आई.
कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचही जणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. आरोपीचं नाव अर्शद आहे, तर वडिलांचं नाव बदर आहे.