नवजात बाळाला इमारतीमधून फेकलं! आई अन् आजी ताब्यात; अंबरनाथमधील संतापजनक घटना

अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेज 2 मधील डी विंगमध्ये ही घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
अंबरनाथ:

निनाद करमरकर, प्रतिनिधी

एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलं आहे.

नक्की वाचा - घरात पत्नीचा मृतदेह, पतीने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; शेतकऱ्याच्या निर्णयाने गावकरी थक्क!

अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेज 2 मधील डी विंगमध्ये ही घटना घडली. या इमारतीत एक महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती. रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री अर्भकाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूममधून इमारतीच्या तिला फेकून दिलं. सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर उमेश पाटील यांनी तिथे धाव घेत पोलिसांना पाचारण केलं. अंबरनाथ शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया यानंतर स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली.

नक्की वाचा - ​​​​​​​भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला. तर या बाळाची आई आणि आज्जी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेलं हे बाळ नको असल्यानंच त्याला फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.