जाहिरात

भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!

Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक सुपर ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे नविन ॲप IRCTC, Rail Maded आणि इतरही अनेक रेल्वे सेवा एकत्रित करेल.

भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!

Indian Railway Launched New Application: रेल्वे ही भारताची लाईफलाईन आहे. देशातील कुठल्याही राज्यातून प्रवास करायचा असेल तर पहिलं प्राधान्य भारतीय रेल्वेला दिलं जातं. कमी पैशात अत्यंत वेगाने प्रवास करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भारतीय रेल्वे. म्हणूनच प्रवाशांच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने एक सुपर ॲप लाँच करण्याची घेषणा केली आहे. ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचेल. त्याचबरोबर, रेल्वे प्रवास आणखी सुलभ, सोपा होईल. या  ॲपच्या मदतीने, रेल्वेच्या विविध सेवा प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आजवर तिकीट काढण्यासाठी, जेवणासाठी अशा  अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या ॲपचा, प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागत असे. पण आता असे होणार नाही. आता या रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे, सर्व सोई-सुविधांचा एकाच ठिकाणी लाभ घेता येणार आहे. या ॲपच्या मदतीने विविध रेल्वे सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी याच ॲपद्वारे प्रवाशांना नोंदणी करून सेवांचा लाभ घेता येईल. 

Facebook, Instagram सारखे ॲप लहान मुलांना वापरता येणार नाही; 'या' देशाचा मोठा निर्णय

(नक्की वाचा: Facebook, Instagram सारखे ॲप लहान मुलांना वापरता येणार नाही; 'या' देशाचा मोठा निर्णय)

    आतापर्यत रल्वेची तिकीट बुक करण्यासाठी  आयआरसीटीसी ॲपचा वापर केला जात होता. ट्रेनचे लोकेशन जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम ॲपची मदत घ्यावी लागते. तर, एखादी तक्रार करायची असल्यास थेट रेल्वे ऑफिस किंवा 139 नंबरचा वापर करावा लागत असे.  ज्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांची गैरसाय होते. परिणामी एकावेळी वेगवेगळ्या गोष्टी हाताळणं कठीण जातं. पण आता अशी किचकट परिस्थिती उद्भवणार नाही. रेल्वेच्या  सुपर ॲपद्वारे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जिथे तिकीट बुकींग (एडवान्स रिजर्वेशन), जेवणाच्या ऑर्डर्सपासून ते तक्रारी नोंदवण्यापर्यंत सर्व गोष्टींचा लाभ एकाच ठिकाणी घेता येणार आहे. 

    'झोमॅटो बॉय' किती पैसे कमावतात?, Viral Video पाहून इमोशनल व्हाल

    (नक्की वाचा: 'झोमॅटो बॉय' किती पैसे कमावतात?, Viral Video पाहून इमोशनल व्हाल)

    ॲडव्हान्स रिजर्वेशन नियमात बदल
    नुकतेच रेल्वेने ॲडव्हान्स रिजर्वेशनचे नियम बदलले आहेत. नव्या नियमानुसार आता प्रवासी फक्त 60 दिवस आधी तिकीट बुक करू शकतात. पूर्वी हा कालावधी 120 दिवसांचा होता. जो आता रेल्वेने कमी केला आहे. यामुळे फसवणूक कमी होईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. याआधी बुक केलेल्या रेल्वे तिकिटांवर हे नियम लागू होणार नाहीत, असं देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
     

    Listen to the latest songs, only on JioSaavn.com