Husband And Wife Clash News : विवाहबाह्य संबंध करून लग्नाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या काही घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. पती-पत्नीतील वाद विवाद त्यांच्या नात्यात दुराव निर्माण करण्याचं कारण बनतात.पण उत्तर प्रदेशमध्ये एक अशी घटना घडली आहे, ज्या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नव्या नवरीने तिच्या नवऱ्याला बस स्टँडजवळ एक प्लेट पकोडे आणण्यासाठी सांगितलं. नवरा ऑर्डर प्लेस करण्यात व्यस्त असतनाच महिला पळून गेली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद जिल्ह्यात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा जिल्ह्यातील प्रितम सिंग नावाच्या व्यक्तीने 18 वर्षांच्या तरुणीसोबत 1 डिसेंबर 2025 रोजी रामपूर जिल्ह्यात लग्न केलं होतं. त्यानंतर प्रितमची पत्नी होळीच्या सणाला माहेरी गेली. सण उत्सव संपल्यानंतर प्रितमने त्याच्या पत्नीला 9 मार्च रोजी घरी आणलं. पुढे अशी धक्कादायक घटना घडेल याचा प्रितमला अंदाजही नव्हता.
नक्की वाचा >> Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले
पतीने पत्नीची खूप शोधाशोध केली, पण नंतर...
प्रवासादरम्यान दोघेही बिलरी बस स्टँडजवळ उतरले. त्यानंतर ते दुसऱ्या बसची वाट पाहू लागले. त्याचदरम्यान महिलेनं भूख लागली म्हणून तिच्या पतीला एक प्लेट पकोडे आणण्यासाठी सांगितलं. त्यानंतर प्रितम पकोडे घेण्यासाठी स्टॉलजवळ गेला. त्यानंतर काही मिनिटांनी तो परतला, तेव्हा त्याची पत्नी तिथू पळून गेली होती. त्याला वाटलं पत्नी आसपासच्या परिसरात कुठेतरी असेल. त्याने शोधाशोध केली पण प्रितमला त्याची पत्नी सापडली नाही.
या घटनेनंतर प्रितम पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पत्नी तिच्या गावखेड्यातील एका तरुणासोबत पळून गेली असावी, अशी संशयास्पद माहिती प्रितमने पोलिसांना दिली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बस स्टँड जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं कामही सुरु आहे.तसच महिलेचा मोबाईल फोन लोकेशन ट्रेस करण्याचंही काम सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.