NIA आणि ATS ची जालन्यात मोठी कारवाई, पहाटे पहाटे काय घडलं?

रात्री दोन वाजल्यापासून NIA आणि ATS चे पथक पाळत ठेवून होते. त्यानंतर पथकाने नदीम सौदागर या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

एनआयए आणि एटीएस यांनी जालन्यात मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई जालनाच नाही तर मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ही करण्यात आली आहे. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या, गांधी नगर परिसरात रात्री दोन वाजल्यापासून NIA आणि ATS चे पथक पाळत ठेवून होते. त्यानंतर पथकाने नदीम सौदागर या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आहे. तो दहशवादी करावाईत सहभाग असल्याच्या संशय NIA आणि ATS विभागाला आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

पंथकाने तब्यात घेतलेला संशयित नदीम सौदागर याचं कुटुंब मूळचे हैदराबाद येथील असल्याची माहिती समोर आलीय. गेल्या अनेक वर्षापासून हे सौदागर कुटुंब जालन्यात चमडा व्यवसायच्या निमित्याने जालना शहरातील गांधीनगर परिसरात वास्तव्यास आहे. नदीम हा मालेगावतील आणि छत्रपती संभाजीनगर येथील दोन तरुणाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. हे तिघे ही दहशवादी करावाईत सहभागी असल्याचा संशय त्यांच्यावर होता. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेतले आहे.

ट्रेंडिंग बातमी - मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

रात्री दोन वाजल्यापासून  NIA आणि ATS च्या पथकाकडून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या मालेगावात करावाई करत असल्याची माहिती ही समोर आली आहे. जालन्यातील नदीम याच्या घराची झाडा झडती या पथकाने घेतली. देशात मोठा दहशदवादी कट नदीम आणि त्याचे सहकारी रचत असल्याचा संशय होता. त्याबाबतचे काही पुरावे हाती लागले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

ट्रेंडिंग बातमी - विकृत कोण? विषय गाजणार? गुहागरमध्ये आजी-माजी आमदार भिडले

दरम्यान जालना,छत्रपती संभाजीनगर,आणि मालेगावातून या पथकाने 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांचा प्लॅन काय होता? ते कोणासाठी काम करत आहेत? त्यांचा उद्देश काय आहे याबाबत आता त्यांच्याकडून माहिती काढली जाणार आहे.या कारवाईचा भाग म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यातही छापेमारी करण्यात आली आहे. चौकशीनंतर या सर्वांचा कोणता कट होता हे स्पष्ट होणार आहे.