मुंबईत घरातून सुरू होता बेकायदेशीर व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड

जाहिरात
Read Time: 2 mins
नालासोपारा:

मनोज सातवी, प्रतिनिधी

नालासोपाराच्या तुळींज पोलिसांनी एका नायजेरीयन महिलेला ड्रग्सच्या तस्करी प्रकरणी अटक केली असून तिच्याकडून एकूण 2 कोटी 12 हजार रूपये किमतीचा बेकायदेशीर एक किलो वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) नावाचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. इडका (IDKA) जोसेफ (30) असे या महिलेचे नाव असून ती मूळची नायजेरियन देशाची नागरिक आहे.  तिच्या व्हिजाची मुदत संपली होती आणि ती बेकायदेशीररित्या नालासोपारा येथे राहत होती, असे तुळींज पोलिसांनी सांगितले.

नालासोपाऱ्यात नायजेरियन तसेच काही इतर लोकांकडून आम्ही पदार्थाची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. अशातच  तुळींज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक नायजेरियन महिला ड्रग्सची विक्री करत असल्याचं समजले होते. त्यानुसार नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथील एसपी अपार्टमेंट येथे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी या महिलेकडे सुमारे 2 कोटी 12 हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाचे एमडी ड्रग्स (मॅफेड्रॉन आढळून आले. 

नक्की वाचा - लेकाची कॉलेज फी भरण्यासाठी आई झाली चोर! व्यथा ऐकताना पोलिसही हळहळले!

पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्या विरोधात एनडीपीएस अॅक्टसह देशात बेकायेशिररित्या वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.