सायबर गुन्ह्याच्या प्रमाण अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर ठग कोणाला आणि कधी गंडा घालतील याचा नेम नाही. त्यांच्या निशाण्यावर सामान्य माणसापासून अति महत्वाच्या वक्तीपर्यंत सर्वच जण आलेले आहेत. कधीना कधी या सर्वांना या सायबर ठगांचा दणका बसलेला आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका निवृत्त मेजर जनरललाच सायबर ठगांनी गंडा घातला आहे. हा गंडा साधासूधा नसून तब्बल 2 कोटींचा आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेले तंत्र सर्वांनाच चक्रावू सोडणारे आहे. त्यामुळेच निवृत्त मेजर जनरलही त्यांच्या जाळ्यात अडकले.
ही घटना दिल्लीतील नोएडा इथं घडली आहे. निवृत्त मेजर जनरल एन. के. धीर हे नोएडाच्या सेक्टर 31 मध्ये राहात. 10 ऑगस्टला त्यांना एक फोन आला होता. त्यात त्याने आपण डीएचएल कुरीअरचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. त्यात तो म्हणाला की तुमच्या नावाने मुंबई ते तैवानसाठी एक पार्सल बुक करण्यात आले आहे. ते पार्सल सीमा शुल्क विभागाने मुंबईत उघडले आहे. त्यात त्यांना पाच पासपोर्ट, पाच बँक क्रेडीट कार्, कपडे, शिवाय 200 ग्रॅम मादक पदार्थ सापडल्याचे सांगितले. शिवाय एक लॅपटॉपही आहे. हे सर्व अवैध आहे.
त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्या बरोबर त्यांचे संभाषण करून दिलं. त्यात तो अधिकारी आपण मुंबई पोलीस बोलत असल्याचे सांगितले. शिवाय त्याने आपले पोलीस असल्याचे ओळखपत्र ही निवृत्त मेजर धीर यांना पाठवले. या सर्व गोष्टी वॉट्सअपच्या माध्यमातून होत होत्या. त्यानंतर एक सीबीआयचे पत्रही धीर यांना पाठवण्यात आले. त्यात लिहीले होते की जेलमध्ये जायचे नसेल तर ही माहिती कुठेही लिक करू नका. नाही तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल अशी भिती त्यांना दाखवण्यात आली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यामुळे निवृत्त झालेले मेजर हे घाबरून गेले. त्यांनी म्युच्युअल फंड आणि एफडी मध्ये ठेवलेले पैसे बँकेतून काढले. त्यानंतर सायबर ठगांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात हे पैसे त्यांनी पाठवले. जवळपास 2 कोटी रूपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यात टाकले. ही खाती या ठगांनीच त्यांना दिली होती. मात्र आपण गंडवलो गेलो आहोत याची कल्पना मेजर धीर यांना आली. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठलं. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विशेष म्हणजे या ठगांना मेजर यांच्या बँक खात्याची सर्व माहिती होती. शिवाय त्यांच्या आर्थिक स्थितीचीही माहिती त्यांना होती. 10 ऑगस्टला फोन आल्यानंतर 14 ऑगस्टला त्यांनी जवळपास 2 करोड रूपये या ठगांच्या खात्यावर वर्ग केली होती. त्यामुळे मेजर यांच्याकडे किती पैसे आहेत. कुठे आहेत. याची संपुर्ण माहितीही त्यांच्याकडे होती हेही आता समोर आले आहे.