Nagpur Crime : नागपुरातील कुख्यात गुंडाचा भीषण The End; विरोधी टोळीने रात्रीच्या अंधारात गेला गेम

या प्रकरणात पोलिसांनी 9 ते 24 वयोगटातील तिघांना अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

संजय तिवारी, प्रतिनिधी

नागपुरातील एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा आरोपी अवैध दारू विक्री करीत होता. त्याची हत्या करणारे तरुणही याच व्यवसायात होते. अवैध दारू विक्री व्यवसायातील स्पर्धेतून या गुंडाची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

नागपुरातील कुख्यात गुंड 31 वर्षीय अजय मुरलीधर गाते ऊर्फ अज्जू याची नागपूरच्या बैरामजी टाऊन भागातील गोंडवाना चौकात रात्री हत्या करण्यात आली. काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांनी त्याला घेरून त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला आणि त्याला जागीच ठार केले. या प्रकरणात मृतक आणि हल्लेखोर दोन्ही अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतलेले असून वर्चस्वाच्या लढाईतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

नक्की वाचा - Pune News : पुण्यात मुस्लीम कुटुंबांच्या घरांवर बहिष्कार, अनेकांना भाड्यानं घरंही मिळेना; नेमकं काय आहे प्रकरण? 

एमडी ड्रग पावडर, अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात सहभागी असलेला अज्जू हा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून उधारी पैसे घेऊन ते परत देत नसे, उलट दमदाटी करत असे. पैसे परत करण्याच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जाते. या प्रकरणात पोलिसांनी 19 ते 24 वयोगटातील तिघांना अटक केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article